Cheteshwar Pujara Instagram
क्रीडा

Cheteshwar Pujara: 'बस कर आता यंगस्टरला खेळू दे...', पुजाराला शिखरने दिलेल्या सल्ल्याने उडवली खळबळ

Shikhar Dhawan: इराणी ट्रॉफीसाठी तयारी करत असलेल्या पुजाराला शिखर धवनने अचंबित करणारा सल्ला दिला आहे.

Pranali Kodre

Shikhar Dhawan commented on Cheteshwar Pujara's post :

भारतात ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ५ ऑक्टोबरला वर्ल्डकपचे बिगूल वाजणार आहेत. हा १३ वा वर्ल्डकप आहे. याचदरम्यान १ ऑक्टोबरपासून भारतातील मानाच्या देशांतर्गत स्पर्धांपैकी एक असलेली इराणी ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे.

इराणी ट्रॉफी स्पर्धेत रणजी ट्रॉफी २०२२-२३ हंगामाचा विजेता संघ सौराष्ट्र आणि शेष भारतीय संघ (rest of India) आमने-सामने येणार आहेत. या सामन्यासाठी भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, त्याची ही तयारी सुरू असतानाच शिखर धवनचे कमेंटने मात्र चाहत्यांमध्ये खळबळ उडवली आहे.

पुजारा सध्या राजकोटमध्ये इराणी ट्रॉफीसाठी फलंदाजीचा सराव करत आहे. तो फलंदाजी सराव करत असतानाचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो काही फटके खेळताना दिसत आहे. मात्र, याच व्हिडिओवर भारताचा सलामीवीर शिखर धवनने अनोखी कमेंट केली आहे.

शिखरने कमेंटमध्ये लिहिले की 'भाई बस कर आता युवा खेळाडूंनाही खेळू दे. इराणीवरून आता ती तुझ्यासाठी नानी ट्रॉफी झाली आहे.' यापुढे शिखरने हसण्याचे इमोजीही शेअर केले आहेत.

Cheteshwar Pujara Instagram

दरम्यान, शिखरला इराणी ट्रॉफी आता पुजारासाठी अगदी सोपी गोष्ट राहिली आहे, असे म्हणायचे असावे, असा अंदाज क्रिकेट चाहत्यांनी लावला आहे. पण काही युजर्सने या कमेंटवर अनेक मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

शिखर आणि पुजारा भारतीय संघातून बाहेर

दरम्यान, सध्या शिखर आणि पुजारा दोघेही भारतीय संघातून बाहेर आहेत. शिखरला आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी तसेच चीनमध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. शिखरने भारताकडून अखेरचा सामना डिसेंबर २०२२ मध्ये खेळला आहे.

तसेच पुजाराही कसोटी संघातून सध्या बाहेर आहे. त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात संधी मिळाली नव्हती. पण असे असताना त्याने काउंटी क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिले.

त्याने यंदा काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्स संघाने नेतृत्वही केले. त्याने या संघाकडून या हंगामात शानदार कामगिरीही केली. त्याने 8 सामन्यांमध्ये 54.08 च्या सरासरीने 649 धावा केल्या. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

आता काउंटी क्रिकेट खेळून परतल्यानंतर तो इराणी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT