Mithali Raj Dainik Gomantak
क्रीडा

'या' 18 वर्षीय खेळाडू भारताला मिळवून देणार विश्वचषक!

न्यूझीलंडमध्ये (New Zealand) पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शेफाली वर्मा आणि ऋचा घोष या युवा खेळाडू शानदार कामगिरी करतील.

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंडमध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (ICC Women's Cricket World Cup) शेफाली वर्मा (Shefali Verma) आणि ऋचा घोष (Richa Ghosh) या युवा खेळाडू शानदार कामगिरी करतील, असा विश्वास भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) व्यक्त केला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) चमकदार कामगिरी करणाऱ्या 18 वर्षीय शेफाली शानदार कामगिरी करणार असल्याचे म्हटले जात आहे. मितालीने इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) साठीच्या कॉलममध्ये लिहिले आहे की, "निश्चितच शफाली वर्मा अशा खेळाडूंपैकी एक आहे, जिच्याकडे देशांतर्गत क्रिकेटमधील दांडगा अनुभव आहे." (Shefali Verma and Richa Ghosh will do well in the ICC Women's Cricket World Cup)

मितालीने म्हटले की, "ती जगातील उभरत्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. मला वाटते की, ती संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी शानदार कामगिरी करेल. तर दुसऱ्या बाजूला स्टार फलंदाज स्मृती मानधना आहे."

यष्टिरक्षकांची शर्यत

दरम्यान, आक्रमक फलंदाज शेफाली वर्मा न्यूझीलंड दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकली नाही. तिने आतापर्यंत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. विकेटकीपर जागेसाठी तानिया भाटियाशी स्पर्धा करणाऱ्या रिचा घोषने मात्र या संधीचे सोने केले आहे. दुसऱ्या आणि चौथ्या एकदिवसीय सामन्यात खेळताना रिचाने सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत.

भारतीय संघ भाग्यवान

नुकत्याच झालेल्या विश्वचषकात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि यजमान न्यूझीलंड यांसारख्या अव्वल संघांविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी भारतीय संघ खूप "भाग्यवान" असल्याचे मितालीने म्हटले आहे. वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूलता असल्याने भारतीय खेळाडूंना भरपूर फायदा होईल.

मिताली पुढे म्हणाली, "न्यूझीलंडमधील मालिकेने आम्हाला परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी दिली. विशेषत: वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूलता जशी मिळाली तशी घरच्या मैदानावर मिळाली नाही. इंग्लंडविरुद्ध आम्ही तीन एकदिवसीय सामन्यांपैकी एक जिंकला आणि इतर दोन सामन्यांमध्ये आम्ही त्यांना कडवी झुंज दिली. त्यानंतर आम्ही सलग २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये विजयी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड रोखली.''

2017 मधील पराभवाबद्दल नेहमीच पश्चात्ताप होईल

2017 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध आठ धावांनी झालेल्या पराभवानंतर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मितालीने या पराभवाची आठवणीत पुढे म्हणाली, “मला 2017 मधील आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आठवतो, आम्ही जिंकण्याच्या खूप जवळ आलो होतो. हा सामना इंग्लंडविरुद्धचा खचाखच भरलेल्या लॉर्ड्स स्टेडियमवर पार पडला होता. मात्र त्या सामन्यामध्ये आम्ही पराजित झालो होतो, याची खंत आम्हाला सदैव राहील.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT