स्मृति मांधनाचा जलवा, ICC ने Women’s Cricketer Of The Year म्हणून केली निवड

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मांधना हिला ICC ने ICC महिला क्रिकेटपटू ऑफ द इयर म्हणून निवडले आहे. आयसीसीने सोमवारी एक निवेदन जारी करुन ही घोषणा केली.
Smriti Mandhana
Smriti MandhanaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला ICC ने ICC महिला क्रिकेटपटू ऑफ द इयर म्हणून निवडले आहे. आयसीसीने सोमवारी एक निवेदन जारी करुन ही घोषणा केली. स्मृतीने गेल्या वर्षी एकूण 22 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. स्मृतीने अनेक सामन्यांमध्ये 38.86 च्या सरासरीने 855 धावा केल्या होत्या. यादरम्यान तिने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. (The ICC Has Selected Smriti Mandhana As The Women’s Cricketer Of The Year)

दरम्यान, स्मृतीने (Smriti Mandhana) गेल्या वर्षी खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार फलंदाजी केली. म्हणूनच आयसीसीने तिची रेचेल हेहो फ्लिंट ट्रॉफीसाठी निवड केली आहे. मंधनाची भारतातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. तिने वर्षानुवर्षे केलेल्या कामगिरीने तिचे महत्त्व वाढले आहे.

Smriti Mandhana
IND Vs SA: ऋषभ पंतच्या खराब शॉटवर विराट संतापला, पहा व्हिडीओ

हे वर्ष स्मृतीसाठी असे गेले

भारतीय महिला क्रिकेट संघाने 2021 मध्ये संघर्ष केला, परंतु स्मृती मंधानाने वर्षभर आपले बॅटमधून आपला जलवा दाखवला. भारताने दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) यजमानपद भूषवले होते. दरम्यान त्यामध्ये आठ सामने खेळले त्यापैकी भारताने फक्त दोन सामने जिंकले होते. दोन्ही सामन्यात मंधानाचा मोलाचा मोठा वाटा होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 158 धावांचे आव्हान ठेवले त्यामध्ये मंधानाने नाबाद 80 धावा केल्या. मालिकेतील शेवटच्या टी-20 सामन्यात तिने नाबाद 48 धावा केल्या.

तसेच, 2021 मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी सामन्यात मंधानाने शानदार कामगिरी केली होती. तिने पहिल्या डावात 78 धावा केल्या. दरम्यान हा सामना अनिर्णित राहिला होता. एकदिवसीय मालिकेत भारताने फक्त एकच सामना जिंकला त्यामध्ये मंधानाने 49 धावा केल्या होत्या. दुसऱ्या टी-20 सामन्यात तिने अर्धशतक झळकावले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धही करुन दाखवले

इंग्लंड दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही मंधानाने अप्रतिम कामगिरी केली. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिने 86 धावा केल्या. तसेच तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com