Shardul Thakur Wedding: भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच केएल राहुल आणि अक्षर पटेल या भारतीय क्रिकेटपटूंनी लग्न केले आहे. आता त्यांच्यानंतर आणखी एक भारतीय क्रिकेटपटू फेब्रुवारीच्या अखेरीस लग्नबंधनात अडणार आहे. हा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आहे.
रिपोर्ट्सनुसार शार्दुल त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकर बरोबर येत्या 27 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे. मिताली ही व्यावसायिक असून तिचा बेकिंगचा व्यावसाय आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.
शार्दुल-मितालीच्या हळदीचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायलर झाले आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शार्दुल झिंगाट गाण्यावर त्याच्या हळीदीत डान्स करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला त्याचे कुटुंबिय आणि मित्रपरिवारही डान्स करताना दिसत आहे.
गोव्यात करायचे होते लग्न
अशीही माहिती मिळाली आहे की शार्दुल आणि मिताली यांना गोव्यात लग्न करायचे होते. मात्र त्यांना ही योजना बदलावी लागली. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार याबद्दल मितालीने सांगितले की 'आधी आम्हाला गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंग करायचे होते. पण अनेक लोक या लग्नासाठी येणार असल्याने आणि तिकडे येण्या-जाण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करता हे खूप अवघड झाले असते.'
दरम्यान, मिताली आणि शार्दुल यांचे कर्जतला लग्न होणार असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्या लग्नासाठी स्वत: मिताली केक डिझाईन करण्यार असल्याचेही म्हटले जात आहे.
दीड वर्षांपूर्वी झालेला साखरपूडा
शार्दुल आणि मिताली यांचा नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपूडा केला होता. त्यांनी मुंबईत त्यांचा साखरपूडा उरकला होता. त्यांनतर आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचे लग्न मराठमोळ्या पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लग्नानंतर शार्दुल येणार टीम इंडियात
दरम्यान, शार्दुलचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 मार्चपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश आहे. त्यामुळे लग्नानंतर तो भारतीय संघात सामील होईल.
तसेच त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. तो आयपीएल 2023 साली कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.