Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

Fr Joseph Thermadam at Old Goa : फादर जोसेफ थर्माडम हे भारतातील एकमेव मूकबधिर धर्मगुरू आहेत आणि त्यांनी इतर लहान मुलांसह चर्चमध्ये पहिल्यांदा मास सादर केला.
Fr Joseph Thermadam at Old Goa : फादर जोसेफ थर्माडम हे भारतातील एकमेव मूकबधिर धर्मगुरू आहेत आणि त्यांनी इतर लहान मुलांसह चर्चमध्ये पहिल्यांदा मास सादर केला.
Hearing Impaired Mass at Old GoaDainik Gomantak
Published on
Updated on

First Hearing Impaired Priest of India in Goa

ओल्ड गोवा: गोव्यात सुरु असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र शव प्रदर्शनाच्या सोहळ्याला अनेक भाविक हजेरी लावत आहेत. दरदिवशी सकाळी चर्चमध्ये धार्मिक मास सादर केला जातो आणि रविवारी ओल्ड गोव्याच्या चर्चमध्ये मूकबधिर समूहाने सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा मास सादर केला. फादर जोसेफ थर्माडम हे भारतातील एकमेव मूकबधिर धर्मगुरू आहेत आणि त्यांनी इतर लहान मुलांसह चर्चमध्ये पहिल्यांदा मास सादर केला.

रविवारी सकाळी ९:३० वाजता फादर जोसेफ थर्माडम आणि १२० लहान मुलांचं सहभाग असलेल्या मूकबधिर समूहाने सांकेतिक भाषेतून मास सादर केला होता आणि यानंतर चर्चच्या प्रदर्शन समितीचे प्रमुख असलेले फादर हेन्री फाल्काओ यांनी जनसमुदायाला संबोधित केले.

Fr Joseph Thermadam at Old Goa : फादर जोसेफ थर्माडम हे भारतातील एकमेव मूकबधिर धर्मगुरू आहेत आणि त्यांनी इतर लहान मुलांसह चर्चमध्ये पहिल्यांदा मास सादर केला.
Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

महत्वाची माहिती म्हणजे फादर जोसेफ थर्माडम हे भारतातील एकमेव मूकबधिर ख्रिस्ती फादर आहेत तसेच संपूर्ण आशिया खंडातील सांकेतिक भाषेतून मास सादर करणारे २६वे फादर आहेत. रविवारी झालेल्या या अनोख्या मासचे आयोजन सेंट फ्रान्सिस झेवियर ट्रेनिंग सेंटर फॉर चिल्ड्रेन विथ डिसॅबिलिटीने DRAG सोबत प्रदर्शन समितीने केले होते.

फादर जोसेफ थर्माडम कोण आहेत?

फादर थर्मडोम (वय, ३८) हे त्रिशूर केरळ येथील होली क्रॉसच्या मंडळाचे सदस्य आहेत. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात आर्चबिशप मार अँड्र्यूज थाझाथ यांनी त्यांना धर्मगुरू म्हणून नियुक्त केले होते. यानंतर फादर जोसेफ भारतातील पहिले तर आशियामधील दुसरे दिव्यांग असलेले धर्मगुरू बनले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com