पणजी : ग्रेट शोमन राज कपूर यांच्या आठवणींना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उजाळा देण्यात आला आणि याचवेळी त्यांचा नातू आणि चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता रणबीर कपूर याने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळीच रणबीर कपूरने पत्नी आलिया भट हीच्यासोबतची पहिली भेट उलघडून सांगितली.
रणबीर म्हणाला की आलीयाने त्याला ‘किशोर कुमार कोण आहे?’ असा प्रश्न विचारला होता. रणबीरने जरी हसत खेळात हा किस्सा सांगितला असला तरीही प्रेषक आणि चाहते यावर बरेच नाराज आहेत. ते रणबीर आणि आलियाने अशाप्रकारे एकमेंकांबद्दल बोलू नये असे मत मांडतायत.
रणबीर कपूरच्या म्हणण्याचा अर्थ होता की हिंदी सिनेमातील किशोर कुमार यांसारखे दिग्गज कलाकार आजच्या तरुणपिढीला माहिती नाही, मात्र त्यांना याची माहिती असली पाहिजे, कारण आपली मुळं अशाप्रकारे विसरली जाऊ शकत नाही.
रणबीरच्या एक वाक्यामुळे मात्र रणबीर-आलियाचा चाहतावर्ग नाराज झाला आहे आणि ते रणबीरच्या अशा बोलण्याबद्दल रोष व्यक्त करतायत.
रणबीर कपूर हा उत्तम सिने अभिनेता आहे आणि त्याने आपल्या विरळा अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. चित्रपट दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे का असे विचारले असता, दिग्दर्शक व्हायची माझी इच्छा असल्याचे रणबीरने सांगितले. एखादी प्रभावी कथा मिळाली तर मी निश्चित दिग्दर्शन करेन, असे तो म्हणाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.