Shane Warne Dainik Gomantak
क्रीडा

वॉर्नला वाटले आणखी 30 वर्षे आहेत... शेनच्या काऊंन्सलरने उघड केली रहस्ये

ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नच्या (Shane Warne) मृत्यूला आता एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. तरीही त्याच्या मृत्यूच्या रहस्याबद्दल चर्चा सुरूच आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नच्या (Shane Warne) मृत्यूला आता एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. तरीही त्याच्या मृत्यूच्या रहस्याबद्दल चर्चा सुरूच आहे. शेन वॉर्नला 4 मार्च रोजी थायलंडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. आता त्यांचे पार्थिव ऑस्ट्रेलियाला नेण्यात आले आहे. दरम्यान शेन वॉर्नची समुपदेशक पुढे आली आहे, जीने शेन वॉर्नबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. लियान यंग 2015 पासून शेन वॉर्नशी संबंधित आहे आणि त्याला नातेसंबंधाबाबत सल्ला देत होती.

द सनच्या वृत्तानुसार, शेन वॉर्नची समुपदेशक लियान यंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न काही काळ खूप आनंदी होता आणि त्याला वाटले की त्याच्याकडे अजून किमान 30 वर्षांचे आयुष्य आहे. लियामच्या मते, शेन वॉर्न भविष्यातील वाटचालीसाठी किंवा सुखी आयुष्यासाठी खूप तयारी करत होता. मुलांसोबत थोडा वेळ घालवता यावा म्हणून त्याने तीन महिने सुट्टी घेतली होती. त्याला तब्येतीची फारशी काळजी नव्हती आपण आणखी तीस वर्ष जगणार असा विश्वास शेनला होता. जेव्हा मी त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा तो आनंदी होता. मात्र शेन वॉर्न फॅट शेमिंग फोटोंबद्दल खूप निराश झाला होता, त्यानंतरच त्याने 14 दिवसा ज्यूस डाएट केला होता. तो सतत स्वत:च्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत होता, असे लियामने सांगितले.

शेन वॉर्नचा मृत्यू झाला तेव्हा तो थायलंडमध्ये होता. शेन वॉर्न आपल्या मित्रांसोबत थायलंडमध्ये सुट्टीवर गेला होता. येथे शेन वॉर्न एका व्हिलामध्ये थांबला होता, सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नचे पोस्टमॉर्टम केले, ज्यामध्ये वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत त्यांच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळून आली नाही. शेन वॉर्नचा मृतदेह आता ऑस्ट्रेलियात नेण्यात आला आहे. 30 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर श्रद्धांजली सभेचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये एक लाखाहून अधिक लोक उपस्थित राहण्याच अंदाज आहे. शेन वॉर्नच्या पार्थिवावरही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT