शेन वॉर्नच्या अंत्यदर्शनासाठी मोजावे लागणार पैसे? मेलबर्न ग्राऊंडवर अंत्यसंस्कार

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे थायलंडमधील एका रिसॉर्टमध्ये निधन झाले. ते 52 वर्षांचे होते.
Shane Warne
Shane WarneDainik Gomantak
Published on
Updated on

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांचे थायलंडमधील एका रिसॉर्टमध्ये निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. वॉर्न यांचे पार्थिव थायलंडहून ऑस्ट्रेलियाला (Australia) रवाना करण्यात आले आहे. शेन वॉर्नच्या (Shane Warne) शवविच्छेदन अहवालात मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे म्हटले आहे.

वॉर्नचे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार अंत्यसंस्कार

दरम्यान, 30 मार्च रोजी शेन वॉर्न यांच्यावर मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 लाख लोक या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस (Scott Morris) देखील उपस्थित राहणार आहेत. वॉर्न यांच्या कुटुंबाने म्हटले आहे की, 'आम्ही पहिल्यांदा वैयक्तिकरित्या अंत्यसंस्कार करणार आहोत.'

Shane Warne
क्रिकेटचे आयकॉन शेन वॉर्न यांचे निधन

तसेच, व्हिक्टोरिया प्रिमिअरचे डॅन अँड्र्यू यांनी वॉर्न यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ''मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर वॉर्नला अखेरचा निरोप देण्यासाठी ऑस्ट्रेलियन नागरिकांना उपस्थित राहता येणार आहे.'' 30 मार्च रोजी सायंकाळी शेन वॉर्न यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. विशेष म्हणजे याबाबतची माहिती आणि तिकीटांबद्दल लवकरच कळवले जाणार असल्याचे डॅन अँड्र्यूज यांनी म्हटले आहे. यामुळे शेन वॉर्न यांच्या अंत्यसस्कांरासाठी तिकीट घ्याव लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com