Shane Warne  Dainik Gomantak
क्रीडा

शेन वॉर्नला या दोन हॉलिवूड स्टार्सला त्याच्या बायोपिकमध्ये हिरोच्या भूमिकेत पाहायचे होते

विशेषत: आयपीएलमध्ये सहभागी झाल्यानंतर वॉर्नची भारतासोबतची ओढ अधिकच वाढली.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) आता आपल्यात नाही. वयाच्या 52 व्या वर्षी या महान स्पिनरने जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्नच्या निधनाने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडनेही या महान खेळाडूला आदरांजली वाहिली. शेन वॉर्नचे भारताशी (India) चांगले संबंध होते. विशेषत: आयपीएलमध्ये (IPL) सहभागी झाल्यानंतर वॉर्नची भारतासोबतची ओढ अधिकच वाढली. शेन वॉर्नने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याला बॉलिवूडमधूनही ऑफर्स येत आहेत. यासोबतच जर त्याचा बायोपिक बनला तर तो कोणत्या अभिनेत्याला आपली भूमिका करायला लावणाक, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली होती.

वॉर्नला त्याच्या भूमिकेसाठी हे दोन कलाकार हवे होते

2015 मध्ये एका मुलाखतीदरम्यान शेन वॉर्नने सांगितले होते की, त्याला बॉलिवूडमधून बायोपिकसाठी ऑफर आली आहे. एका व्यक्तीने स्क्रिप्ट लिहिली आहे आणि कंपनी शूटिंगसाठी तयार आहे. त्यात मुख्य भूमिकेत कोणाला पाहायला आवडेल का, असा प्रश्न या क्रिकेटपटूला विचारला असता, वॉर्नने हॉलिवूडच्या दोन दिग्गज कलाकारांची नावे घेतली होती.त्याला लिओनार्डो डिकॅप्रियो किंवा ब्रॅड पिट यांना मुख्य भूमिकेत पाहायला आवडेल असे ,सांगितले होत.

वॉर्नच्या निधनावर क्रिकेट जगतासह तमाम क्रिकेट चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. रणवीर सिंग, अक्षय कुमार, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, उर्मिला मातोंडकर, बोमन इराणी, अर्जुन कपूर, अर्जुन रामपाल आणि रणदीप हुड्डा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. वॉर्नच्या नेतृत्वाखाली शिल्पा शेट्टीच्या आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने पहिली स्पर्धा जिंकली होती.

दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

शेन वॉर्न 52 वर्षांचा होता आणि 4 मार्च 2022 रोजी कोह सामुई, थायलंड येथे त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 1001 विकेट घेतल्या. क्रिकेटच्या इतिहासातील महान गोलंदाज म्हणून तो कायम स्मरणात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT