ओल्ड ट्रॅफर्डवर वॉर्नने टाकला होता करिश्माई चेंडू, ठरला 'बॉल ऑफ द सेंचुरी'

या (Shane Warne) ऑस्ट्रेलियन दिग्गजाने आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी 339 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून एकूण 1001 विकेट्स घेतल्या आहेत.
Shane Warne
Shane WarneDainik Gomantak
Published on
Updated on

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे वयाच्या 52 व्या वर्षी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये होता, तिथे तो बेशुद्धावस्थेत आढळला. ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून क्रिकेट चाहते त्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. वॉर्नने (Shane Warne) क्रिकेटच्या मैदानात दिलेले अमूल्य योगदान सदैव क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात राहील. या ऑस्ट्रेलियन दिग्गजाने आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी (Australia) 339 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून एकूण 1001 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये त्याने टेस्ट फॉरमॅटमध्ये 708 आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये 293 विकेट्स घेतल्या आहेत. (Old Trafford Ball Of The Century Unique Story)

Shane Warne
Shane Warne Demise: मास्टर ब्लास्टर झाला भावूक, म्हणाला...वॉर्नी तुझी आठवण येईल'

दरम्यान, वॉर्नला क्रिकेटच्या इतिहासात शानदार कामगिरीसाठी स्मरणात ठेवले जाणार असले, तरी मँचेस्टर कसोटीदरम्यान त्याने इंग्लिश फलंदाज माईक गॅटिंगला ज्याप्रकारे गोलंदाजी केली त्याबद्दल तो शतकानुशतके लक्षात राहील. खरं तर, 4 जून 1993 रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ ओल्ड ट्रॅफर्डवर आमनेसामने आला होता. या सामन्यात त्याने जवळपास 90 अंशाच्या कोनात चेंडू फिरवताना विरोधी फलंदाज माईक गॅटिंगला केली होती. वॉर्नच्या या करिष्माई गोलंदाजीनंतर क्रिकेट चाहते आणि खेळाडू थक्क झाले होते. वॉर्नने आपल्या पहिल्या ऍशेस मालिकेत पाच सामने खेळून 29 वेळा सफलता मिळविली होती. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियन दिग्गजाने एका मुलाखतीत सांगितले की, 'मी असा चेंडूही टाकू शकतो.' त्यानंतर वॉर्नने सांगितले की, 'त्या काळात मी फक्त लेगब्रेक टाकण्याचा प्रयत्न करायचो, परंतु चेंडू 90 अंशांनी वळला, हे अविश्वसनीय होते.' या ऑस्ट्रेलियन दिग्गजानेही 'बॉल ऑफ द सेंच्युरी' हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असल्याचे मानले.

शिवाय, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने 1992 मध्ये सिडनीमधून भारतीय संघाविरुद्ध (Indian Team) आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले होते. त्याच वेळी, त्याने 2007 मध्ये सिडनीमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com