Shane Warne  Dainik Gomantak
क्रीडा

Shane Warne Passes Away: शेन वॉर्नने गोलंदाजीत केले होते शानदार 'रेकॉर्ड'

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 708 बळी घेणारा तो (Shane Warne) दुसरा खेळाडू होता.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे आज निधन झाले. त्याच्या मॅनेजमेंटने ऑस्ट्रेलियन मीडियाला एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. शेन वॉर्न थायलंडमध्ये काही दिवसांपासून राहत होता. त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे. शेन वॉर्नच्या (Shane Warne) निधनाने क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 708 बळी घेणारा तो दुसरा खेळाडू होता. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. (Shane Warne Set Many Records In His Cricket Career)

दरम्यान, शेन वॉर्नने 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिली कसोटी भारताविरुद्ध त्याने खेळली होती. त्याने ऑस्ट्रेलियासाठी (Australia) 145 कसोटी सामने खेळला त्यामध्ये त्याने 708 विकेट घेतल्या. त्याच्या पुढे फक्त श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आहे, ज्याने 800 विकेट्स घेतल्या आहेत. 2007 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका क्रिकेटने मुरली आणि वॉर्नच्या नावावर वॉर्न-मुरलीधरन ट्रॉफीचे नाव दिले होते. शेन वॉर्नने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट घेतल्या.

तसेच, क्रिकेटचे बायबल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्डेनने 20 व्या शतकातील पाच क्रिकेटपटूंमध्ये शेन वॉर्नची निवड केली. 2013 मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाला 1999 चा विश्वचषक जिंकण्यास मदत केली होती. यासोबतच त्याने अ‍ॅशेस मालिकेत सर्वाधिक 195 विकेट्स घेतल्या होत्या.

शिवाय, शेन वॉर्नला पदार्पणाच्या कसोटीत 150 धावा देऊन विकेट मिळाली होती. परंतु नंतर त्याने बरेच यश मिळवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1001 विकेट्स वॉर्नने घेतल्या. त्याने 38 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आणि 10 वेळा एका सामन्यात 10 बळी घेतले. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा लेग स्पिनर आहे. 600 आणि 700 कसोटी बळी घेणारा शेन वॉर्न हा पहिला क्रिकेटर आहे. एका वर्षात सर्वाधिक 96 विकेट्स घेण्याचा विक्रम शेन वॉर्नच्या नावावर आहे. त्याचबरोबर वनडेमध्ये सलग चार विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. शेन वॉर्नने लागोपाठ तीन डावात ही अप्रतिम कामगिरी केली होती. शेन वॉर्नने फलंदाजीतही शानदार विक्रम केला आहे. त्याने शतक न करता सर्वाधिक कसोटी धावा (3154) केल्या आहेत. त्याची कसोटीतील सर्वाधिक धावसंख्या 99 धावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT