Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022 Auction: शाकिब अल हसनने इतिहास रचून फ्रँचायझींना केलं आकर्षित

सलग 5 टी-20 सामन्यांमध्ये सामनावीर ठरुन त्याने (Shakib Al Hasan) हा इतिहास रचला आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 चा लिलाव सुरु होण्याआगोदरच एखादा खेळाडू मोठा धमाका करतो, इतिहास रचतो, याची तुम्ही कल्पना केली नसेल. मात्र हे घडले आहे. असाच काहीसा प्रकार बांगलादेशचा (Bangladesh) अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनसोबत (Shakib Al Hasan) घडणार आहे, ज्याने मोठ्या लिलावाच्या पूर्वसंध्येला इतिहास रचला आहे. त्याने जे स्थान गाठले आहे, जिथे टी-20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) पोहोचणारा तो एकमेव खेळाडू आहे. सलग 5 टी-20 सामन्यांमध्ये सामनावीर ठरुन त्याने हा इतिहास रचला आहे. आता अशा मॅचविनरवर कोणतीही फ्रँचायझी पैसा खर्च करण्यास इच्छुक असणारच ना. आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावातही तेच होणार आहे. (Shakib Al Hasan Woos Franchises By Creating History)

दरम्यान, शाकिब अल हसनची आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात बेस प्राईज 2 कोटी रुपये असली तरी या अष्टपैलू खेळाडूला त्यापेक्षा जास्त किंमत मिळण्याची शक्यता आहे. शाकिब गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. परंतु सध्या तो शानदार अशा प्राइम फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे फ्रँचायझींमध्ये रंजक स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

पाचव्या सामन्याचा हिरो शाकिब अल हसन

शकीब अल हसनने सलग 5 टी-20 सामन्यांमध्ये सामनावीर बनून इतिहास रचला आहे. परंतु त्याने अशी कोणती कामगिरी केली ती जाणून घेऊया. गेल्या 5 सामन्यात त्याने 181 धावा केल्या. या 5 पैकी 3 सामन्यात त्याने झंझावाती अर्धशतक झळकावले आहे. तसेच त्याने मागील सलग 5 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 10 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये एका सामन्यात 23 धावांत 3 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. अर्थातच शाकिब त्याच्या अष्टपैलू खेळामुळे सामनावीर ठरला.

शाकिब अल हसनची आयपीएलमधील कामगिरी

शाकिब अल हसनचे आयपीएलमधील रिपोर्ट कार्ड पाहिल्यास त्याने 71 सामन्यांमध्ये 52 डावांमध्ये 124.49 च्या स्ट्राईक रेटने 793 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच वेळी, त्याने बॉलसह 63 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये एका सामन्यात 17 धावांत 3 विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT