Mushfiqur Rahim & Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs BAN: बांगलादेशच्या 'या' स्टार जोडीची मोठी कामगिरी, धोनी-युवराजच्या विक्रमाशी केली बरोबरी!

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 टप्प्यातील पहिला सामना बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे.

Manish Jadhav

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 टप्प्यातील पहिला सामना बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे.

लाहोरमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बांगलादेशच्या संघाने 193 धावा केल्या. 47 धावांत चार विकेट गमावलेल्या बांगलादेशच्या संघाची धुरा शाकिब अल हसन आणि मुशफिकुर रहीमने सांभाळली.

या दोघांनी 5व्या विकेटसाठी 100 धावांची शानदार भागीदारी केली. विशेष म्हणजे, या जोडीने शतकी भागीदारी करत एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

खरे तर, शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आणि मुशफिकुर रहीम यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या किंवा त्याहून कमी विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

अशी कामगिरी करत दोघांनी एमएस धोनी आणि युवराज सिंग या स्टार जोडीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

युवी आणि धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या किंवा त्यापेक्षा कमी विकेटसाठी पाच वेळा शतकी भागीदारी केली होती. या बाबतीत एमएस धोनी आणि सुरेश रैना ही जोडी आघाडीवर आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये 5व्या किंवा त्यापेक्षा कमी विकेटसाठी सर्वाधिक शतकी भागीदारी

6 - एमएस धोनी आणि सुरेश रैना

5 - एमएस धोनी आणि युवराज सिंग

5 - शाकिब अल हसन आणि मुशफिकुर रहीम

पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी

बांगलादेशच्या (Bangladesh) या जोडीने गेल्या चार एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली.

या सामन्यात शतकी भागीदारी करण्यापूर्वी या जोडीने पाकिस्तानविरुद्ध अनुक्रमे 77, 50 आणि 30 धावांची भागीदारी केली होती. या डावात शाकिबने 53 आणि मुशफिकुरने 64 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT