MS Dhoni | Shai Hope
MS Dhoni | Shai Hope ICC
क्रीडा

Shai Hope: 'धोनीचा तो सल्ला...', इंग्लंडला पराभवाचा दणका देणाऱ्या विंडीज कर्णधाराने सांगितले शतकामागचे गुपीत

Pranali Kodre

Shai Hope reveals MS Dhoni Advice:

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू असून पहिला सामना सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, अँटिग्वा येथे पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 4 विकेट्सने विजय मिळवला.

वेस्ट इंडिजच्या या विजयात कर्णधार शाय होपने शतक करत मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, होपने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर एमएस धोनीने दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले.

या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 326 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 49 व्या षटकात 3 षटकार मारत वेस्ट इंडिजचा विजय शाय होपने निश्चित केला. त्याने 83 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह 109 धावांनी नाबाद खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सामना जिंकल्यानंतर शतकाबद्दल आणि धोनीच्या सल्ल्याबद्दल बोलताना शाय होप म्हणाला, 'या शतकामुळे विजय मिळवू शकलो आणि त्यासाठीच मी खेळतो. आम्ही जिंकल्याबद्दल आनंदी आहे. मी मागे एकदा एमएस धोनीशी बोललो होतो, तेव्हा त्यानी मला सांगितले की तू विचार करतो, त्यापेक्षा तुझ्याकडे क्रिजवर बराच वेळ असतो आणि ती गोष्ट नेहमीच माझ्या लक्षात राहिली.'

या सामन्यात होपबरोबर रोमारियो शेफर्डनेही चांगला खेळ केला. त्याने होपबरोबर सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. शेफर्ड 49 धावांवर नाबाद राहिला. तसेच सलामीवीर एलिक अथानाझ (66) आणि ब्रेंडन किंग (35) यांनी सलामीला 104 धावांनी शतकी भागीदारी नोंदवली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजला ३२६ धावांचे आव्हान पार करणे सोपे गेले.

होप संघाचे कौतुक करताना पुढे म्हणाला, 'शेफर्डने शानदार खेळ केला. आम्ही विजयाने या मालिकेची चांगली सुरुवात केली. अशाच खेळाची पुनरावृत्ती पुढच्या सामन्यात करायची आहे. सलामीवीरांनीही चांगला खेळ केला, आम्हाला आणखी चांगली सुरुवात पुढच्या सामन्यात करायची आहे.'

त्याचबरोबर होप म्हणाला, 'आम्ही काही झेलही सोडले, त्यामुळे जर तुम्हाला जगातील सर्वोत्तम संघ बनायचे असेल, तर तसे खेळावेही लागेल. सलामीवीरांनी जबाबदारी घेऊन खेळल्याचा आनंद आहे, ते दोघेही चांगले खेळाडू आहे. अशीच कामगिरी पुढील सामन्यात करायची आहे.'

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. तसेच झॅक क्रावलीने 48 धावांची आणि फिलिप सॉल्टने 45 धावांची खेळी केली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटाकात सर्वबाद 325 धावा उभारल्या.

गोलंदाजीत इंग्लंडकडून गस ऍटकिन्सन आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच वेस्ट इंडिजकडून रोमारिओ शेफर्ड, गुडाकेश मोती आणि ओशान थॉमस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT