Goa News Live Update: 'बीएल‍ओ'च्या मानधनात दुपटीने वाढ!

Goa Today's 02 August 2025 Live Updates: गोव्यातील राजकारण, गुन्हे, अपघात, पर्यटन, कला - क्रिडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
Goa Latest Updates
Goa Latest Updates Dainik Gomantak

'बीएल‍ओ'च्या मानधनात दुपटीने वाढ!

बूथ पातळीवरील 'बीएलओ' आणि मतदार यादीच्या पडताळणीसाठी नेमलेल्यांच्या मानधनात दुपटीने, तर पर्यवेक्षकांच्या मानधनात दीडपटीने वाढ. निवडणूक नोंदणी अधिकार्‍यांना ३० हजार आणि सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांना २० हजार रुपये मानधन. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर

दुर्गेश नाईक तुरुंग यांचा भव्य निरोप समारंभ

३९ वर्षे कर्तव्य बजावणाऱ्या दुर्गेश नाईक तुरुंग कर्मचाऱ्यांचा भव्य निरोप समारंभ.

Goa News: कृषी मंत्री रवी नाईक यांनी कुत्र्याच्या चाव्याने पीडित महिलेची घेतली भेट

कृषी मंत्री रवी नाईक यांनी माजी पीएमसी नगरसेवक रितेश नाईक यांच्यासमवेत, हवेली-कुर्टी येथील कुत्र्याच्या चाव्याने पीडित महिलेची फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट घेतली आणि रुग्णाची प्रकृती तपासली आणि मदत केली.

Gomantak Contest: दैनिक गोमंतक हस्तलेखन स्पर्धा इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी; जास्तीत जास्त सहभागाचे आवाहन शिक्षण विभाग

दैनिक गोमंतक वृत्तपत्र १ ऑगस्ट २०२५ पासून ४० दिवसांच्या कालावधीसाठी इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करत आहे. प्रत्येक शाळेतील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातील. शिक्षण संचालनालयाने सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रमुखांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिपत्रक जारी केले आहे.

Transfer Orders: दोन आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

कार्मिक विभागाने दोन आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत; नंदकुमार ई. परब यांची पुडुचेरी येथे बदली करण्यात आली आहे, तर विशाल व्ही. सुर्वे यांची लडाख येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्मिक विभागाने दोन आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत; नंदकुमार ई. परब यांची पुडुचेरी येथे बदली करण्यात आली आहे, तर विशाल व्ही. सुर्वे यांची लडाख येथे नियुक्ती करण्यात आली आहे.PM Kisan: गोव्यात आतापर्यंत पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना २४ कोटी मिळाले; CM सावंत

गोव्यातील शेतकऱ्यांना आज पीएम किसान योजनेद्वारे आतापर्यंत २४ कोटी देण्यात आले आहेत. आज एकाच दिवशी १.२० कोटी रू. शेतकऱ्यांच्या खात्यावर आले असून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेतून १.२० लाख मिळाले आहे. गोव्यात आज फलोत्पादन निर्मिती वाढत असून गोवा भाजीमाल निर्यात करीत आहे. हि मोठी बाब आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

शिगाव येथे श्री सातेरी देवस्थानचा मुख्य दरवजाचा उघडण्याचा प्रयत्न, चोरटे फरार

शिगाव येथील श्री सातेरी देवस्थानाच्या मुख्य दरवाजाच्या लॉकची अज्ञात चोरट्यांकडून छेडछाड. मात्र त्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मंदिरात येण्यापूर्वी याच चोरट्यांनी माटोजे गावातील एका व्यक्तीची मोटरसायकल चोरल्याचा संशय. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.

आग्वाद येथे दोघांवर चाकू आणि कात्रीने हल्ला; तामिळनाडूच्या पाच जणांना अटक

आग्वाद येथे दोघांवर चाकू आणि कात्रीच्या मदतीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी तामिळनाडूच्या पाच जणांना अटक केली आहे. शकीर नासार (२५), शाका मुथ्थु (२८), कुमार संपाद (२९), तामिल शेलवाल (२२) आणि एस. सुधाकर (४२) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com