Shaheen Afridi Umar Gul Video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: LIVE सामन्यात राडा! मैदानावरच भिडले शाहीन आफ्रिदी अन् कोच उमर गुल; पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shaheen Afridi Umar Gul fight live match: पाकिस्तान क्रिकेट संघ आणि वाद यांचे जुने नाते आहे. सध्या पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे.

Sameer Amunekar

पाकिस्तान क्रिकेट संघ आणि वाद यांचे जुने नाते आहे. सध्या पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान संघ आधीच दबावाखाली आहे. अशातच १६ मे पासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तान संघातील अंतर्गत वाद थेट मैदानावर चव्हाट्यावर आला आहे.

स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांच्यात भर मैदानावर तीव्र शब्दांत वाद झाल्याचे पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर म्हणून राग?

मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान संघाने दुसऱ्या कसोटीत काही मोठे बदल केले. यामध्ये खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या शाहीन आफ्रिदीला थेट अंतिम ११ खेळाडूंच्या (Playing XI) संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहीन या निर्णयामुळे नाराज होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत होता, तेव्हा शाहीनला 'ड्रिंक्स बॉय' बनवून खेळत असलेल्या फलंदाजांना पाणी आणि रणनीतीचा निरोप देण्यासाठी जाण्यास सांगण्यात आले.

हात झटकून शाहीन पुढे निघून गेला

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, शाहीन आफ्रिदी मैदानावर जाण्यासाठी तयार उभा असताना कोच उमर गुल त्याच्याजवळ येतात आणि फलंदाजांना देण्यासाठी आणखी एक विशेष निरोप सांगू लागतात. मात्र, संतापलेल्या शाहीनला उमर गुल यांचे बोलणे ऐकण्यात अजिबात रस नव्हता.

त्याने अत्यंत रागात हात झटकला आणि त्यांचे ऐकून न घेता तरातरा मैदानाकडे निघून गेला. शाहीनच्या या उद्धट वर्तनाचा आणि शिस्तभंगाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यावर माजी क्रिकेटपटूंकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सामन्यात बांगलादेशचे पारडे जड

एकीकडे संघात वादाचे ग्रहण लागले असताना दुसरीकडे मैदानावरही पाकिस्तानची स्थिती अत्यंत बिकट आहे. बांगलादेशने पहिल्या डावात यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासच्या १५९ चेंडूंतील १२६ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर २७८ धावा उभारल्या. उत्तरदाखल फलंदाजीला उतरलेला पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या २३२ धावांवर आटोपला.

पाकिस्तानकडून माजी कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ६८ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने दुसऱ्या डावात ३ बाद ११० धावा केल्या असून, त्यांच्याकडे आता १५६ धावांची भक्कम आघाडी आहे. पाकिस्तान हा सामना आणि मालिका दोन्ही गमावण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT