Shahrukh Khan Dainik gomantak
क्रीडा

RR कडून झालेल्या पराभवानंतर शाहरुखचा KKR संघाला प्रोत्साहानात्मक संदेश

केकेआरच्या चाहत्यांनी शाहरुखकडे केली संघ व्यवस्थापन आणि कर्णधार बदलण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

काल राजस्थान रॉयल्सने (RR) कोलकाता नाईट रायडर्सचा सात धावांनी पराभव केला. ब्रेबॉर्न क्रिकेट मैदानावर आयपीएल (IPL) 15 मधील 30 क्रमांकाचा हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक राहिला. पण शेवटी राजस्थानने हा सामना जिंकला. या पराभवानंतर कोलकाता संघाचा मालक शाहरुख खानने ट्विट करून आपल्या संघाला प्रोत्साहन दिले आहे. शाहरुखने आपल्या खेळाडूंचे नाव घेत त्यांचे कौतुक केले आणि म्हटले की, आपल्या संघाला कोणत्याही सामन्यात हार पत्करावी लागली तरी अशा प्रकारे उत्तम खेळून हरणे चांगले आहे. राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील सामन्यानंतर शाहरुख खानने ट्विट केले होते. (RR vs KKR)

त्याच्या या ट्विटला त्याची टीम कोलकाता नाईट रायडर्सने लगेच उत्तर दिले. मात्र शाहरुखच्या या ट्विटवर केकेआरचे (KKR) अनेक चाहते शाहरुखकडे संघ व्यवस्थापन आणि कर्णधार बदलण्याची मागणी करताना दिसले.आता शाहरुखच्या या कौतुकानंतर केकेआरचा संघ IPLमध्ये पुढे कसा खेळतो हे पाहावे लागेल.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर राजस्थानने स्पर्धेतील चौथा विजय नोंदवला आहे. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलरने 103 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने 19 चेंडूत 38 धावा केल्या. राजस्थानने 217 धावा फलकावर लावल्या.

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी केकेआरचा संघ मैदानात उतरला. संघाने सुरुवातीलाच सुनील नरेनची विकेट गमावली. मात्र, त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने अॅरॉन फिंचसह नऊ षटकांत 107 धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी झालेल्या या भागीदारीनंतर अॅरॉन फिंचने 58 धावा करत कृष्णाला विकेट दिली. तर थोड्या वेळाने नितीश राणाने चहलला विकेट दिली.

यानंतर केकेआरचा संघ डावाच्या 17व्या षटकातच अडकला. युझवेंद्र चहलने या षटकात चार विकेट घेत सामना राजस्थानकडे वळवला. शेवटी उमेश यादवने ट्रेंट बोल्टच्या षटकात दोन षटकार, एक चौकार मारून सामना कोलकात्याच्या दिशेने वळवला. पण ओबेड मॅकॉयने शेवटच्या षटकात 11 धावा देत राजस्थानला विजय मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT