आयपीएल नेहमीच खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची संधी देते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून अनेक खेळाडू राष्ट्रीय संघात पुनरागमन करू शकले आहेत. यावेळी आयपीएलमध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांना चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये पुन्हा स्थान मिळवण्याची संधी होती. पण त्यांच्या खराब कामगिरीमुळे त्यांचे स्वप्न जवळपास उद्ध्वस्त झाले आहे. उलट, पुढच्या हंगामात आयपीएलमध्ये (IPL) दिसण्याची आशाही त्यांनी मोडली आहे. असे खेळाडू नेमके कोण ते जाणून घेऊयात. (The future of these cricketers is in danger)
विजय शंकर
गुजरातकडून खेळणाऱ्या विजय शंकरच्या आयपीएल कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मोसमात तो गुजरातकडून चार सामने खेळला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त 19 धावा झाल्या आहेत. याशिवाय त्याचा स्ट्राइक रेट 54.2 आहे. अशा स्थितीत केवळ टीम इंडियातच (Team India) नाही तर पुढील आयपीएलमध्येही विजय शंकरला स्थान मिळवणे कठीण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणेची कारकीर्द उतरणीला लागली आहे. रहाणेला आधीच कसोटी संघातील स्थान गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियात स्थान मिळवण्याची संधी होती. मात्र त्याने ही संधी सोडली आहे. रहाणे केकेआरकडून 5 सामने खेळला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून केवळ 80 धावा झाल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही केवळ 100 आहे.
मनीष पांडे
लखनऊसाठी मनीष पांडेलाही या मोसमात संस्मरणीय कामगिरी करून टीम इंडियात स्थान मिळवण्याची संधी होती. मात्र त्याला आतापर्यंत काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्याने आतापर्यंत आयपीएलमधील 4 सामन्यात केवळ 60 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याचं टीम इंडियात पुनरागमन करणं कठीण जात आहे.
ख्रिस जॉर्डन
चेन्नईकडून खेळणारा ख्रिस जॉर्डन डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. पण गुजरातविरुद्धच्या त्याच्या खराब गोलंदाजीनंतर पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये कोणताही संघ त्याच्यावर बाजी मारण्याची शक्यता फारच कमी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.