India Women Cricket Team Enters Asian Games Final Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games Semi Final 2026: शेफालीचं धडाकेबाज शतक, दीप्ती-नंदनीचा घातक मारा! बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक; गोल्डसाठी श्रीलंकेशी भिडणार

India Women Cricket Team Enters Asian Games Final: जपानमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्स 2026 मधील महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर 114 धावांनी दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली.

Manish Jadhav

India Women Cricket Team Enters Asian Games Final: जपानमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्स 2026 मधील महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर 114 धावांनी दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. या विजयामुळे भारतीय महिला संघाचे सिल्वर मेडल पक्के झाले असून आता गोल्डसाठी भारताची गाठ श्रीलंकेशी पडणार आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 195 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तराखालोखाल 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 15.4 षटकांत अवघ्या 81 धावांवर गारद झाला.

भारतीय फलंदाजीची मुख्य आकर्षण ठरली ती आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा! शेफालीने बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 49 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 9 उत्तुंग षटकारांच्या मदतीने आपले पहिलेवहिले व्हाईट-बॉल आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. या ऐतिहासिक कामगिरीसह एशियन गेम्सच्या इतिहासात शतक झळकावणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. तिला उत्तम साथ देत स्मृती मानधनाने 37 धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने 40 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बांगलादेशकडून मारुफा अक्तर, शंजिदा अक्तर, राबेया खान आणि नाहिदा अक्तर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

196 धावांच्या विशाल ध्येयाचा पाठलाग करायला उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर जुएरिया फिरदौस खातेही न उघडता बाद झाली. त्यानंतर बांगलादेशची पडझड सातत्याने सुरुच राहिली. सलामीवीर दिलीरा अक्तरने 27 धावा केल्या, तर शर्मीन अक्तर आणि सुल्ताना खातून यांनी प्रत्येकी 10 आणि 12 धावा जोडल्या. या तिघींव्यतिरिक्त बांगलादेशचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. भारताकडून गोलंदाजीत दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी घातक मारा करत प्रत्येकी 3-3 बळी घेतले आणि बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत फायनल गाठली. आता 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या महाअंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात सुवर्णपदकासाठी थरारक लढत पाहायला मिळेल. अंतिम सामना जिंकणारा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरेल, तर पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल. दुसरीकडे, कांस्यपदकासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. शेफालीच्या या शतकी खेळीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: पक्षांतर, सरकारी 'खोगीरभरती' अन् बेरोजगारीवर घणाघात! मतदारांनी आता जाब विचारावा; 2027ची विधानसभा निवडणूक ठरवणार गोव्याच्या राजकारणाची दिशा?

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार? तज्ज्ञांच्या विविध पर्यायांवर चर्चा, अंतिम निर्णय

Houthi Saudi Conflict: सौदी अरेबियानंतर कुणाचा नंबर? हूतींच्या धमकीमुळे पाकिस्तान-तुर्कीच्या गोटात घबराट; म्हणाले, ''परकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही!" VIDEO

Goa Political Satire: 'देव दिता आनी देवचार नाडटा'; गणपतीसमोर पाच दिवस भक्ती केली, पण चौथ्याच दिवशी 'पणती'ने घात केला!

Government Jobs: केंद्र सरकारच्या विविध विभागांत 53 गोमंतकीयांना नोकरी; रोजगार मेळाव्यातून नियुक्ती

SCROLL FOR NEXT