Shadman Islam Injury Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: क्रिकेटच्या मैदानावर थरारक घटना! क्षेत्ररक्षण करताना खेळाडूचा पाय घसरला; वेदनेने विव्हळत मैदानातच पडला, स्ट्रेचरवरून न्यावे लागले बाहेर

Shadman Islam Injury: क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंना दुखापती होणे ही सामान्य बाब असली, तरी काही दुखापती चिंताजनक ठरतात.

Sameer Amunekar

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंना दुखापती होणे ही सामान्य बाब असली, तरी काही दुखापती चिंताजनक ठरतात. बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बांगलादेशचा फलंदाज शादमान इस्लाम याला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली. दुखापतीमुळे त्याला स्वतःच्या पायांवर चालत मैदानाबाहेर जाणेही शक्य झाले नाही. अखेर स्ट्रेचरच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर एमआरआय स्कॅनसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

क्षेत्ररक्षण करताना शादमानचा पाय घसरला

सध्या वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेश दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना सिल्हेट येथे सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना शादमान इस्लामला दुखापत झाली.

सामन्यातील ७८व्या षटकात चेंडूचा पाठलाग करत असताना शादमानचा पाय अचानक घसरला आणि तो मैदानावर कोसळला. मैदानावर मोठ्या प्रमाणात दव असल्यामुळे त्याचा पाय घसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पडताच त्याला तीव्र वेदना झाल्या. तो मैदानातच वेदनेने विव्हळताना दिसला. ही घटना पाहून बांगलादेशच्या संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफही चिंतेत पडले.

स्ट्रेचरच्या मदतीने मैदानाबाहेर नेले

शादमानची दुखापत गंभीर असल्याचे लक्षात येताच त्याला मैदानाबाहेर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला स्वतःच्या पायांवर चालणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मैदानात स्ट्रेचर मागवण्यात आले. अखेर स्ट्रेचरच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले.

यानंतर त्याला एमआरआय स्कॅनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, स्कॅनचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे दुखापतीचे नेमके स्वरूप आणि तो पुन्हा कधी मैदानात परतणार, याबाबत स्पष्टता नाही.

बांगलादेशच्या फलंदाजीची चिंता वाढली

या दुखापतीमुळे बांगलादेश संघाची चिंता वाढली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करत असून, त्यांनी ३०० धावांचा टप्पा पार केला आहे. आता बांगलादेशची फलंदाजी सुरू झाल्यानंतर शादमान खेळण्यासाठी मैदानात उतरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, मागील कसोटी सामन्यात शादमान इस्लामने शतकी खेळी केली होती. त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजीसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे. जर दुखापतीमुळे त्याला फलंदाजी करता आली नाही, तर संघाला मोठा फटका बसू शकतो. त्याची दुखापत गंभीर असल्यास तो केवळ या सामन्यालाच नव्हे, तर आगामी काही सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Employees: 18 वर्षे वेतन आयोग बदललाच नाही! सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचाऱ्यांचा डिसेंबरपासून एल्गार

Shavina Shirodkar Controversy: शविना शिरोडकर प्रकरण तापले! माफीवरून वाद कायम; अजय खोलकरांविरोधात केपे पोलिसांत तक्रार

Indian Super League: घरच्या मैदानावर विजयाची प्रतीक्षा संपणार? बंगळूर एफसीविरुद्ध एफसी गोव्याची कसोटी; 3 गुणांचे लक्ष्य

PoK मध्ये पाकिस्तानी सैन्याचा रक्तरंजित थरार! भीषण गोळीबारात 4 बालकांसह 18 जणांचा मृत्यू; जखमींना उचलणाऱ्यांवरही झाडल्या गोळ्या

Taxi Protest: 4 दिवसांत आदेश कायमचा रद्द करा; अन्यथा राज्यभर चक्का जाम, टॅक्सीमालकांचा सरकारला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT