Bangalore FC

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: स्वयंगोलमुळे ईस्ट बंगालला मोठा झटका

सामन्याच्या उत्तरार्धात स्वयंगोलमुळे ईस्ट बंगालला इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी दोन गुणांचे नुकसान सोसावे लागले.

किशोर पेटकर

पणजी: सामन्याच्या उत्तरार्धात स्वयंगोलमुळे ईस्ट बंगालला इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी दोन गुणांचे नुकसान सोसावे लागले. माजी विजेत्या बंगळूर एफसीने (Bangalore FC) त्यांना पिछाडीवरून 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

सामना बांबोळी येथील एथलेटिक स्टेडियमवर झाला. सेम्बोई (थोंगोकोसिएम) हाओकिप याच्या गोलमुळे ईस्ट बंगालने 28व्या मिनिटास आघाडी प्राप्त केली. फ्रीकिकनंतर वाहेंगबाम लुवांग याच्या क्रॉसपासवर सेम्बोईने चेंडूला अचूक दिशा दाखविली. सेम्बाईचा हा यंदाचा दुसरा, तर एकंदरीत आठवा आयएसएल (Indian Super League) गोल ठरला. मात्र 55व्या मिनिटास ईस्ट बंगालच्या सौरव दास याने उंच उडी घेत हेडिंगवर चेंडू आपल्याच संघाच्या नेटमध्ये धाडला, त्यामुळे बंगळूरला बरोबरी साधता आली आणि ईस्ट बंगालला स्पर्धेतील पहिल्या विजयापासून वंचित राहावे लागले. यावेळी चेंडू अडविण्यासाठी ईस्ट बंगालचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य झेपावला, पण चेंडू त्याच्या ताब्यात आला नाही.

प्रशिक्षक होजे मान्युएल डायझ यांना बदलल्यानंतर हंगामी प्रशिक्षक रेनेडी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगाल संघ मंगळवारी मैदानात उतरला. त्यांची ही नऊ लढतीतील पाचवी बरोबरी ठरली. त्यामुळे पाच गुणांसह ते शेवटच्या अकराव्या क्रमांकावर कायम राहिले. बंगळूरची ही दहा लढतीतील चौथी बरोबरी असून त्यांचे आता 10 गुण झाले आहेत. एफसी गोवास मागे टाकून ते आता आठव्या स्थानी गेले आहेत.

उत्तरार्धात माजी विजेत्या बंगळूरने खेळ सुधारला, पण गोल करून प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेणे त्यांना जमले नाही. तुलनेत स्वयंगोलचा अपवाद वगळता ईस्ट बंगालने बचावात लक्षवेधक खेळ केला. सामन्याच्या 46व्या मिनिटास मैदानात उतरलेल्या बंगळूरच्या अनुभवी सुनील छेत्रीला यंदाच्या आयएसएल स्पर्धेत गोल नोंदविण्यात अपयश आले. छेत्रीला 72व्या मिनिटास गोल करण्यास संधी होती, पण ईस्ट बंगालच्या हिरा मोंडलने त्याला यशस्वी होऊ दिले नाही. 81व्या मिनिटास सेम्बोई हाओकिपला सामन्यातील दुसरा वैयक्तिक गोल करून ईस्ट बंगालला आघाडीवर नेणे शक्य होते, परंतु नेटसमोर कोणीच नसताना त्याच्या फटक्याचा नेम चुकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT