Netherlands Team  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: नेदरलँडचा धमाका, स्कॉटलंडला हरवून वनडे वर्ल्ड कपचं तिकीट केलं बुक

Netherlands in ODI World Cup-2023: नेदरलँड संघाने गुरुवारी वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये मोठा उलटफेर घडवला.

Manish Jadhav

Netherlands in ODI World Cup-2023: नेदरलँड संघाने गुरुवारी वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये मोठा उलटफेर घडवला. स्कॉटलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नेदरलॅंडने 42.5 षटकात 4 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह त्याने वर्ल्ड कपमध्ये शानदार एन्ट्री केली. वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणारा नेदरलँड हा श्रीलंकेनंतरचा 10 वा संघ ठरला आहे. स्कॉटलंडने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला पराभूत करुन सुपर-6 पॉइंट्स टेबलच्या टॉप-2 वर कब्जा केला होता. त्याचे तिकीट जवळपास निश्चित वाटत होते, परंतु नेदरलँडने त्याला पराभूत करुन वर्ल्ड कपमधून बाहेर काढले.

दरम्यान, डी लीडने पहिल्यांदा स्कॉटलंडविरुद्ध 10 षटकांत 52 धावांत 5 बळी घेतले. यानंतर 277 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने शानदार शतक झळकावले. डीलीडने 92 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 123 धावा केल्या. त्याचवेळी, कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 25 आणि साकिब झुल्फिकारने 33 धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला 42.5 षटकांत विजय मिळवून दिला. या विजयानंतर नेदरलँड नेट रनरेटच्या बाबतीत स्कॉटलंडपेक्षा वरचढ ठरला. अशारितीने यावर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला.

5 व्यांदा पात्र

नेदरलँडला पाचव्यांदा वनडे वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं. यापूर्वी 1996, 2003, 2007 आणि 2011 मध्ये तो वर्ल्ड कपचा भाग होता. वनडे वर्ल्ड कप-2023 साठी 8 संघ दोन महिन्यांपूर्वी पात्र ठरले होते. वन डेवर्ल्ड कपचे क्वालिफायर सामने झिम्बाब्वेने यजमान असलेल्या उर्वरित 2 संघांसाठी आयोजित केले होते. यापैकी श्रीलंका आणि नेदरलँडने पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि वर्ल्ड कपमसाठी तिकिटे बुक केली.

वर्ल्ड कप-2023 मध्ये सहभागी होणारे 10 संघ - भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, श्रीलंका आणि नेदरलँड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT