Óscar Cabrera Adames
Óscar Cabrera Adames Dainik Gomantak
क्रीडा

Basketball Player Died: कोविड लसीकरणाला दोष देणाऱ्या 28 वर्षीय बास्केटबॉलपटूचे हार्ट अ‍ॅटॅकने निधन

Pranali Kodre

Óscar Cabrera Adames basketball Player Died: डॉमिनिकनचा बास्केटबॉलपटू ऑस्कर कॅब्रेरा ऍडम्सचे वयाच्या 28 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे बास्केटबॉल विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

ऑस्कर कॅब्रेरा ऍडम्सला सँटो डोमिंगो हेल्थ सेंटरमध्ये स्ट्रेस टेस्ट करत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याने अखेरचा श्वास घेतला. तो मायोकार्डायटिस या आजाराशी लढा देत होता.

हा हृदयाच्या बाबातीतील आजार असून ही अशी स्थिती आहे, ज्यात हृदयाच्या कार्यात आणि रक्ताभिसरणासाठी अडथळा निर्माण होत असतो. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार या स्थितीतचा रुग्णावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, त्याच्या निधनानंतर त्याच्या काही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहेत. अशाच एका पोस्टमध्ये त्याने त्याच्या मायोकार्डिटिसच्या त्रासासाठी कोविड लसीकरणाला दोष दिला होता.

त्याने म्हटले होते की 'मी त्या लसींचा दोन डोस घेतल्यानंतर मला मायोकार्डिटिसनं ग्रासलं आणि मला माहित होते, मला खूप लोकांनी आधीच सावध केले होते.' याशिवाय त्याने असेही सांगितले होते की स्पेनमध्ये खेळणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक खेळाडूला ही लस घेणे गरजेचे होते.

दरम्यान, कॅब्रेरा ऍडम्सच्या हृदयविकाराच्या झटक्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हे देखील स्पष्ट होऊ शकले नाही की स्ट्रेस टेस्टचा त्याच्या निधनाशी काही संबंध आहे का. स्ट्रेस टेस्ट साधारणत: शारीरिक हालचालींदरम्यान हृदयाच्या कार्यांचे आणि हृदयाच्या इलेक्ट्रिकल हालचालींचे मुल्यमापन करण्यासाठी केली जाते.

कॅब्रेरा ऍडम्सबद्दल सांगायचे झाल्यास तो डॉमिनिकन क्रीडा क्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्व असलेल्या ह्युगो कॅब्रेराचा भाचा होता. दरम्यान, 2016 साली तो एका गुन्ह्यातही अडकला होता.

अल्पवयीन मुलांचे ऑनलाइन शोषण करणाऱ्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आलेल्या अनेक लोकांपैकी तो एक होता. पण त्यानंतर तो एक प्रतिभाशाली बास्केटबॉल खेळाडू म्हणून ओळखला जात होता.

दरम्यान, त्याच्या निधनाने क्रीडा क्षेत्रालाच धक्का बसला असून कोविड लसीकरणाशी संबंधित संभाव्य धोक्यांबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच सध्या त्याच्या निधनाचा तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT