India Football Team: छेत्रीच्या टीम इंडियाला मिळणार 'एवढ्या' कोटीचे बक्षीस, ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Intercontinental Cup जिंकणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाला ओडिशा सरकारकडून कोटींचे बक्षीस देण्यात येणार आहे.
India Football team
India Football teamDainik Gomantak
Published on
Updated on

Odisha CM Naveen Patnaik announced Rs 1 Crore Reward for India Football Team:

भारतीय फुटबॉल संघाने नुकताच इंटरकॉन्टिनेंटल कपचे विजेतेपद मिळवले. रविवारी रात्री कलिंगा स्टेडियम, भुवेनेश्वर, ओडिशा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने लेबनॉनला 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळवला. या सामन्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मोठी घोषणा केली आहे.

पटनायक यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी 1 कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.

India Football team
Sunil Chhetri Video: 'आई तू बाबा मी होणार...'! सुनील छेत्रीनं अनोखं सेलिब्रेशन करत दिली 'गुडन्यूज'

या स्पर्धेच्या समारोप समारंभात बोलताना पटनायक यांनी सांगितले की 'या प्रतिष्ठेच्या इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेचे आयोजन करणे आमच्या राज्यासाठी अभिमानाची गोष्टी आहे. भारताने मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. आमचा हाच हेतू आहे की आम्ही आणखी बऱ्याच फुटबॉल स्पर्धा ओडिशामध्ये आयोजित कराव्यात आणि ओडिशा व भारतात खेळाच्या प्रगतीसाठी पाठिंबा द्यावा.'

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी ओडिशा सरकारचे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार मानले. या स्पर्धेतील सर्व सामने भुवनेश्वरला झाले होते.

कल्याण चौबे म्हणाले, 'यापेक्षा चांगले ठिकाण आम्हाला मिळू शकले नसते. मी या स्पर्धेच्या शानदार आयोजनासाठी आणि सहभागी सर्व संघासाठी दिलेल्या सर्व पाठिंब्यासाठी व आदरातिथ्यासाठी ओडिशा सरकारचे आभार मानतो.'

India Football team
Lionel Messi Fan Detained: मैदानात घुसून मेस्सीला भेटणाऱ्या चाहत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; झाली 'ही' कारवाई

दरम्यान अंतिम सामन्यात पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नव्हता. पण दुसऱ्या हाफमध्ये सामन्याच्या 46 व्या मिनिटाला भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने पहिला गोल केला. त्यानंतर 65 व्या मिनिटाला लल्लियांझुआला छांगटेने दुसरा गोल केला. त्यामुळे भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारताने शेवटपर्यंत टिकवून ठेवली आणि विजेतेपदाला गवसणी घातली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की इंटरकॉन्टिनेंटल कपचा हा तिसरा हंगाम होता. या हंगामाचे आयोजन भारतीय फुटबॉल महासंघाने केले आहे. 2018 साली या स्पर्धेचे आयोजन नेहरु कपच्या जागेवर करण्यात आले होते.

भारताने पहिला हंगाम जिंकला होता. त्यानंतर 2019 मध्ये दुसरा हंगाम उत्तर कोरियाने जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com