Saurashtra Cricket Association Stadium renamed X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: तिसऱ्या कसोटीपूर्वी बदलले राजकोटमधील स्टेडियमचे नाव; जडेजा, पुजारासह सौराष्ट्रच्या खेळाडूंचाही सन्मान

Pranali Kodre

Saurashtra Cricket Association Stadium renamed:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटला गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. दरम्यान, या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी (14 फेब्रुवारी) राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नाव बदलण्यात आले.

बुधवारी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नाव बदण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सौराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशासक निरंजन शाह यांच्या सन्मानार्थ या स्टेडियमचे नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात आले.

निरंजन शाह हे सौराष्ट्राचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. तसेच त्यांनी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिवपदही सांभाळले आहे. ते बीसीसीआयचेही माजी सचिव राहिले आहेत. निरंजन शाह यांनी 1965 ते 1975 साला दरम्यान 12 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात त्यांनी 281 धावा केल्या होत्या.

दरम्यान, या नाव बदलण्याच्या कार्यक्रमाची झलक दाखवणारा एक व्हिडिओ बीसीसीआयनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या कार्यक्रमासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा असे अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफही उपस्थित होता.

याशिवाय बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शाह आणि भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी सौराष्ट्राचे खेळाडू चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा, जयदेव उनाडकट यांचाही सन्मान करण्यात आला. भाकताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि सुनील गावसकर यांनी सौराष्ट्राकडून नजीकच्या काळात मोठे यश मिळवणाऱ्या खेळाडूंचाही सन्मान केला.

या स्टेडियममध्ये आत्तापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये 2 कसोटी, 4 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT