Neymar jr Dainik Gomantak
क्रीडा

Neymar Jr: नेमारवर सौदीतील फुटबॉल क्लब उदार! प्रवासासाठी महागडे जेट, राहायला 25 खोल्यांचं घर अन् गाड्या

Neymar jr signs for Al Hilal: स्टार फुटबॉलर नेमारने सौदी अरेबियामधील अल हिलाल क्लबबरोबर करार केला आहे.

Pranali Kodre

Saudi Arabia Prince sent private Boeing 747 jumbo jet for Neymar jr : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियर आता सौदी अरेबियामध्ये फुटबॉल खेळताना दिसणार आहे. त्याने सौदी अरेबियामधील अल हिलाल क्लबबरोबर करार केला आहे. याबद्दल अल हिलालने अधिकृत माहिती दिली आहे. अल हिलाल हा सौदी अरेबियामधील सर्वात यशस्वी संघ आहे.

दरम्यान, अल-हिलालबरोबर करार करताच नेमारला अनेक थक्क करणाऱ्या सुविधाही मिळणार असल्याची सध्या चर्चा आहे. नेमारने अल-हिलालबरोबर करार केल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सर्वात महागडे बोइंग 747 जेट दिसत असून ते सौदी प्रिन्स अल वालिद बिन तलाल यांच्या मालकिचे आहे. या जेटमध्ये बसून नेमार सौदीची राजधानी रियाधला आला. या व्हिडिओमध्ये नेमार म्हणत आहे की 'लेट्स गो टू रियाध.'

दरम्यान, रियाधला येण्यावेळी प्रिन्स अल वालिद बिन तलाल यांनी नेमारशी संवादही साधला. या संवादाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केला आहे.

तथापि, मीडियातील अनेक रिपोर्ट्सनुसार नेमारला अल हिलालबरोबर करार करण्याबरोबर अनेक महागड्या सुविधाही मिळणार आहे. नेमारचा अल हिलालबरोबर 90 मिनियन युरोपेक्षा अधिकचा (साधारण 800 कोटी रुपयांहून अधिक) करार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच त्याला याबरोबरच 40X10 स्विमिंग पूल असलेले 25 बेडरुमचे घर, घरकाम करणारे पूर्णवेळ कर्मचारी, 24 तास ड्रायव्हर, बेंटली कॉन्टिनेंटल जीटी कार, एस्टन मार्टिन डीबीएक्स कार आणि लॅम्बोर्गिनी कार, प्रवासासाठी प्रायव्हेट जेट अशा अनेक सुविधा मिळणार असलेल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

पीएसजीबरोबरचा प्रवास संपला

नेमारने अल-हिलालबरोबर करार केला असल्याने त्याचा आता फ्रान्समधील प्रसिद्ध क्लब पॅरिस सेंट-जर्मेनसोबतचा (PSG) प्रवास संपला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 31 वर्षीय नेमार गेल्या अनेक वर्षांपासून युरोपियन फुटबॉलमध्ये खेळत होता.

त्याने बार्सिलोना क्लब आणि पॅरिस सेंट-जर्मेन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2017 मध्ये त्याने बार्सिलोना संघाची साथ सोडत पॅरिस सेंट-जर्मेन क्लबमध्ये सामील झाला होता. पॅरिस सेंट-जर्मेनसाठी त्याने 173 सामन्यात 118 गोल केले आणि 5 लीग विजेतीपदेही मिळवली. आता तो सौदीमधील क्लबमध्ये सामील झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT