Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Twitter/Media_SAI
क्रीडा

Malaysia Open: खेलरत्न सात्विक-चिराग जोडीची मलेशिया ओपनच्या अंतिम फेरीत धडक; विश्वविजेत्या कोरियन जोडीचा पराभव

Malaysia Open: सात्विक आणि चिराग, ज्यांना नुकतेच खेलरत्नने सन्मानित करण्यात आले आहे, ते त्यांच्या दुसऱ्या सुपर 1000 विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहेत.

Manish Jadhav

Malaysia Open: आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शनिवारी मलेशिया ओपन सुपर 1000 च्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मोसमातील त्यांच्या पहिल्या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत असलेल्या भारतीय जोडीने विश्वविजेत्या कोरियन जोडी सिओ सेउंग जे आणि कांग मिन ह्युकडीश यांचा सरळ गेममध्ये पराभव करुन अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर, भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले आणि सहा गेम पॉइंट वाचवले. आठ गुणांनी आघाडी घेत कोरियन जोडीवर 21-18, 22-20 असा विजय नोंदवला.

दरम्यान, सात्विक आणि चिराग, ज्यांना नुकतेच खेलरत्नने सन्मानित करण्यात आले आहे, ते त्यांच्या दुसऱ्या सुपर 1000 विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये इंडोनेशियन ओपनमध्ये त्यांनी पहिले विजेतेपद पटकावले होते. ही तीच कोरियन जोडी होती जिला भारतीयांनी गेल्या जूनमध्ये उपांत्य फेरीत पराभूत केले होते. एकूणच, सात्विक आणि चिराग यांचा आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सिओ आणि कांग यांच्याविरुद्ध 3-1 असा रेकॉर्ड आहे.

दुसरीकडे, या सामन्यात लहान आणि वेगवान रॅलीच्या जोरावर सात्विक आणि चिराग यांनी सुरुवातीच्या गेममध्ये 9-5 अशी आघाडी घेतली. मात्र, भारतीय जोडीकडून काही लांब शॉट्स आणि काही चतुर स्ट्रोकच्या खेळामुळे कोरियन जोडीला सलग चार गुण घेता आले.

यानंतर भारतीय जोडीने सामन्यात पुनरागमन केले, ज्यांनी कोरियन जोडीला आपला जलवा दाखवून दिला. नेटवर आणखी एका शानदार गेममुळे भारतीयांना ब्रेकमध्ये दोन गुणांची आघाडी मिळाली. कोरियन जोडीने भारतीय जोडीच्या काही कमकुवत पुनरागमनानंतर स्कोर 12-13 असा केला. मात्र, सात्विकच्या दमदार स्मॅश आणि चिरागच्या फ्लिक सर्व्हच्या बळावर भारतीयांनी 17-13 अशी परतफेड केली.

दरम्यान, दुसऱ्या गेममध्ये सिओ आणि कांग अधिक सावध होते आणि त्यांनी प्लेसमेंटवर लक्ष केंद्रित केले होते. भारतीय जोडीने 9-4 अशी आघाडी घेतली परंतु कोरियन जोडीने 11-6 अशी आघाडी कायम राखण्यात यश मिळवले. सुरुवातीच्या गेममध्ये सिओ अधिक आक्रमक दिसत होता, कांगने दुसऱ्या गेममध्ये दमदार प्रदर्शन केले. तिसरा गेम निश्चित दिसत होता, परंतु नंतर गेममध्ये ट्विस्ट आला. 14-20 ने पिछाडीवर पडल्यानंतर सात्विक आणि चिरागने शानदार पुनरागमन केले. त्यांनी सलग आठ गुण मिळवून कोरियन जोडीला अडचणीत आणले आणि अखेरीस गेम हातात घेऊन सामना जिंकला.

दुसरीकडे, आशियाई गेम, आशियाई चॅम्पियनशिप, इंडोनेशियन सुपर 1000, कोरिया सुपर 500 आणि स्विस ओपन सुपर 300 मध्ये सुवर्णपदक जिंकणारे सात्विक आणि चिराग हे गेल्या वर्षी सर्वात यशस्वी भारतीय खेळाडू ठरले. त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चायना मास्टर्स सुपर 750 ची अंतिम फेरी गाठली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT