Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Twitter/Media_SAI
क्रीडा

Asian Games: चिराग-सात्विक 'नंबर वन'! बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकत रचला इतिहास

Pranali Kodre

Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty won Gold Medal in Badminton at 19th Asian Games Hangzhou:

चीनमध्ये सुरु असेलल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी या जोडीने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आहे.

चिराग आणि सात्विक यांनी शनिवारी बॅडमिंटनमधील पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या सोलग्यू छोई आणि वोन्हो किम या जोडीला 21-18, 21-16 अशा फरकाने पराभूत करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. यासह चिराग आणि सात्विक हे आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत.

अंतिम सामन्यात पहिला गेम जवळपास 29 मिनिटांचा झाला. या गेममध्ये सात्विक आणि चिराग यांच्या जोडीला सातत्याने छोई आणि किम यांनी आव्हान दिले. पण, सात्विक आणि चिराग यांनी पुन्हा पुन्हा पुनरागमन करत आपला खेळ उंचावत नेला आणि अखेर हा गेम जिंकत आघाडी घेतली.

दुसऱ्या गेममध्ये मात्र सात्विक आणि चिरागने आपली लय कायम ठेवताना प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढवला. या गेममध्ये त्यांनी पूर्ण वर्चस्व ठेवले आणि हा गेमही जिंकत सामना जिंकला आणि इतिहास रचला. अंतिम सामना साधरण 57 मिनिटे सुरू होता.

त्याचबरोबर सात्विक आणि चिराग यांनी आता या सुवर्णमय विजयासह जागतिक क्रमवारीत पुरुष दुहेरीमधील अव्वल स्थानावर आपला दावा सांगितला आहे. ते आता सोमवारी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान होतील.

एचएस प्रणॉयनेही जिंकले पदक

दरम्यान, बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या एचएस प्रणॉयने कांस्य पदक मिळवले आहे. त्याला उपांत्य फेरीत चीनच्या ली शी फेंगने 16-21, 9-21 अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे प्रणॉयला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, तो पुरुष एकेरीत आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा सईद मोदी यांच्यानंतरचा दुसऱ्याच भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT