Pravin Jadhav Dainik Gomantak
क्रीडा

साताऱ्याच्या प्रविणची ऑलीम्पीकसाठी निवड

सातारकरांची (Satara) मान अभिमानाने उंचावली आहे.

दैनिक गोमन्तक

साताऱ्याने (Satara) आज पर्यंत देशाला वेगवेळ्या क्षेत्रांत अनेक मोठी माणस दिली आहेत. त्यातच आता फलटण तालुक्यातील सरडे या गावातील प्रविण जाधवची (Pravin Jadhav) टोकियो मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (Tokyo Olympics 2020) धनुर्विद्या या खेळ प्रकारात निवड झाली असल्याची माहीती मिळाली आहे . त्यामुळे आता सातारकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. (Pravin Jadhav from satara was selected for the Olympics in the archery category)

अतिशय गरीब कुटुंबात सरडे या गावात प्रविणचा जन्म झाला. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असुन प्रवीणचे वडील मजुरी करुन घरगाडा चालवतात. या सगळ्या परिस्थितीवर मात करुन प्रविण ऑलिम्पिक मध्ये पोहोचल्याने सर्वांसाठीच हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे.

धनुर्विद्यात प्रवीणचे असलेल कौशल्य पाहुन फलटण मधील प्रशिक्षक विकास भुजब यांनी प्रविण ला पहिल्यांदा धनुर्विद्ये चे धडे दिले होते. एवढ्यावरच न थांबता त्याच्या निवडीसाठी सुद्धा भुजबळ यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. या आधी सुद्धा प्रविणने बरीच पदके देशाला जिंकुन दिली असुन 10 वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत देशाला सुवर्ण पदक मिळवुन देण्याचे त्याचे स्वप्न देखील आता लवकरत पुर्णत्वास येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT