WTC Final: पराभावाला फक्त पुजाराच जबाबदार नाही : गावसकर

शुभमन गिलने भारत अ संघासाठी मधल्याफळीत चांगली कमगिरी केली आहे. भारतीय अ संघात त्याने अनेकदा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.
सुनील गावसकर, चेतेश्वर पुजारा
सुनील गावसकर, चेतेश्वर पुजाराDainik Gomantak

नवी दिल्ली: भारतीय संघात (Indian team) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) संघातील एक चांगला खेळाडू म्हणून ओळखले जाते. परंतु सध्या त्याच्या खराब फॉर्ममुळे (Poor form) त्याच्यावर टीका होत आहे. पुजाराच्या बॅटमधून सध्या रन निघताना दिसत तर नाहीच पण खेळाच्या प्रती जो अप्रोच त्याच्यावरुन देखील पुजारावर प्रश्न उठताना दिसत आहेत.

यावरुन आता पुजारावर भारताचे माजी फलंदाजी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी पुजाराच्या पाठिंबा दिला आहे. स्पोट् र्स तकशी बोलताना ते म्हणाले, जागतिक कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभावचा दोष फक्त पुजाराला देऊन चालणार नाही. न्यूझीलंडच्या काही फलंदाजांनी स्लो खेळ केला होता. एकाबाजू पुजाराने संयमाने खेळ केल्यास दुसऱ्या बाजूने इतर फलंदाज शॉट खेळू शकतात. मयंक अग्रवालने सलामीला चांगली फलंदाजी करत व्दिशतकी खेळी केली आहे. शुभमन गिलच्या जागी मयंक आणि रोहीतला सलामीला पाठवणे योग्य राहील त्यातून गिल आणि मयंक यांच्यात टेक्निकली कोण चांगले आहे ते लक्षात येऊ शकेल.

सुनील गावसकर, चेतेश्वर पुजारा
WTC Final: चूकीची 'प्लेइंग इलेव्हन' खेळविल्यानेच भारताचा पराभव

कसोटी क्रिकेटबाबत बोलताना गावसकर म्हणाले, कसोटी क्रिकेटमध्ये संयम महत्त्वाचा असतो. अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांमध्ये संयम कमी दिसला. हवेत शॉट खेळण्याच्या नादात भारतीय फलंदाज लवकर बाद झाले. चेंडू जिथे स्विंग होतो तेथे संयमाने खेळ करणे आवश्यक असते. भारतीय फलंदाजांनी संयमाने खेळ केला असता तर अंतिम सामन्याचा निकाल वेगळ असता. इंग्लंडमधील हवामान, मैदान, खेळपट्टी हे न्यूझीलंड संघासाठी अनुकूल होते. त्याचा फयदा देखील त्यांना झाला. पुजाराने जानेवारी २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी केलेली नाही.

दरम्यान, माजी निवडकर्ता देवांग गांधी म्हणाले, हनुमा विहारी वगळता आपल्या संघातील राखीव खेळाडू हे सलामीचेच फलंदाज होते. पृथ्वी, मयंक, पडिक्कल हे सगळे सलामीचे फलंदाज आहेत. तसेच के.एल. राहुल हा देखील सलामीलाच खेळतो. त्यामुळे येथे टीम मॅनेजमेंटचा रोल महत्त्वाचा असतो. शुभमन गिलने भारत अ संघासाठी मधल्याफळीत चांगली कमगिरी केली आहे. भारतीय अ संघात त्याने अनेकदा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला पाचव्या क्रमांकावर खेळण्यास संधी द्यावी. असे गांधी यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com