Sarjubala Devi Boxing Dainik Gomantak
क्रीडा

सरजुबाला देवी बॉक्सिंगमध्ये करणार पदार्पण, भारत-पाकमध्ये होणार सामना

सरजुबाला टांझानियाच्या कयाझ लुलू गाथाबीशी भिडणार

दैनिक गोमन्तक

जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारी भारतीय बॉक्सर सरजुबाला देवी (Sarjubala Devi) 26 फेब्रुवारी रोजी व्यावसायिकरित्या सर्किटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दुबईत 26 फेब्रुवारीला 51 किलो वजनी गटात सरजुबालाचा पहिला सामना टांझानियाच्या कयाझ लुलु गाथाबीशी होणार आहे.

सरजुबाला टांझानियाच्या कयाझ लुलू गाथाबीशी भिडणार

माजी विश्वविजेती सरजुबालाची भारतीय बॉक्सिंग कौन्सिलने नोंदणी केली आहे. ती आपला पहिला सामना खेळणार आहे. त्याच 31 वर्षीय टांझानियाची बॉक्सर कयाझ लुलू गाथाबीने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत 13 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 7 जिंकले आहेत आणि 6 वेळा ती हरली आहे.

माजी विश्वविजेती भारतीय बॉक्सर सरजुबाला देवी यांनी निवेदनात म्हटले आहे की, 'मी खरोखरच चांगली तयारी केली आहे. हौशी आणि व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये मोठा फरक आहे. यापूर्वी बॉक्सिंगच्या तीन फेऱ्या करायचे, मात्र आता सहा फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे मी त्यानुसार तयारी केली आहे. इथे आता फक्त कौशल्य चालणार नाही, त्यासाठी संयम ठेवावा लागेल कारण जेव्हा स्पर्धा जास्त फेऱ्यांच्या असतात तेव्हा त्या जास्त काळ चालतात त्यामुळे अशा वेळी संयमाची गरज भासते.'

भारत विरुद्ध पाकिस्तान रंगणार सामना

सामन्यात दुबईतील व्यावसायिक सर्किटमध्ये टांझानियाच्या कयाझ लुलूविरुद्ध पदार्पण सामना खेळेल. त्याच दिवशी संध्याकाळी दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही होणार आहे. या सामन्यांमध्ये सध्याचा नंबर वन भारतीय बॉक्सर WBC इंडियाकडून सहभागी होणार आहे.

जे त्यांच्या संबंधित वजन विभागांमध्ये खालीलप्रमाणे आहेत.

फैजान अन्वर (WBC इंडिया रँक 1, वेल्टर वेट), लालरिन्सांगा तलाऊ (WBC युवा वर्ल्ड चॅम्पियन आणि WBC इंडिया रँक 1, सुपर फेदरवेट), नटलाई लालबियाकिमा (WBC इंडिया रँक 1, किमान वजन)

या सामन्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

• फैजान अन्वर (भारत) वि यामीन खान (पाकिस्तान)

• सरजुबाला देवी (भारत) वि लुलू कायगे (टान.)

• लालरिनसांगा तलाउ (भारत) वि मुहम्मद सिकंदर अब्बासी (पाकिस्तान)

• नटलाई लालबीअक्कीमा (भारत) वि फिदा मुहम्मद (पाकिस्तान)

• लालडिंगलियाना (भारत) विरुद्ध मुहम्मद अम्मार खान (पाकिस्तान)

• शेखोम रेबाल्डो सिंग (भारत) विरुद्ध मुखतियार अहमद कक्कर (पाकिस्तान)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

999cc इंजिन, 215 bhp पॉवर अन् 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेग! BMW ची सर्वात दमदार सुपरबाईक भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

Under 11 National Badminton: गोव्याची अमायरा धुमटकर विजेतेपदाच्या उंबरठ्यावर, 11 वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप

T20 Cricket: गोव्यावर टी-२० क्रिकेटमध्ये नामुष्की, 6 पराभवांसह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत खराब कामगिरी

Underpass Bus Incident: छतावरील कॅरिअरमुळे बस भुयारी मार्गात अडकली; वास्कोत वाहतुकीचा खोळंबा, प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT