PSL 2022: 'जावई' ची ची झंझावाती फलंदाजी पाहून शाहिद आफ्रिदी झाला थक्क

पाकिस्तान सुपर लीग 2022 (Pakistan Super League 2022) मध्ये सोमवारी लाहोर कलंदर आणि पेशावर झाल्मी यांच्यात अटीतटीचा सामना झाला.
Shahid Afridi
Shahid AfridiDainik Gomantak

पाकिस्तान सुपर लीग 2022 मध्ये सोमवारी लाहोर कलंदर आणि पेशावर झाल्मी यांच्यात अटीतटीचा सामना झाला. वहाब रियाझच्या पेशावरने शाहीन आफ्रिदीच्या (Shaheen Afridi) लाहोर संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी 20 षटकांत सात बाद 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात लाहोरचा (Lahore) संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 158 धावाच करु शकला. यानंतर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला आणि यात पेशावरने बाजी मारली. (Pakistan Super League 2022 Shahid Afridi Batted Brilliantly)

दरम्यान, लाहोरने हा सामना आधीच गमावला असता, परंतु कर्णधार असणाऱ्या शाहीन आफ्रिदीने तुफानी फलंदाजी करत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. शाहीनने 20 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. यानंतर पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज शाहिद आफ्रिदीनेही त्याच्या 'जावई'चे कौतुक केले आणि त्याच्यासाठी सोशल मीडियावर पोस्टही केली.

Shahid Afridi
PSL 2022: पेशावर झल्मीच्या विजयाचा 'हिरो' शोएब मलिक

शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) शाहीनचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो त्याच्याप्रमाणेच फलंदाजी करताना सेलिब्रेशन करत आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले - ''शाहीन आफ्रिदी! अफलातून फलंदाजी केली.'' शाहीन अजून शाहिदचा जावाई बनलेला नाही.

वास्तविक, 2021 मध्ये शाहिद आफ्रिदीने स्वतः ट्विट करुन म्हटले होते की, शाहीनच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी माझ्याशी संपर्क साधला आहे. याबद्दल आम्ही दोन्ही कुटुंबीय बसून बोलत आहोत. मात्र, दोघेही लग्न करणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Shahid Afridi
PSL 2022 सुरु होण्यापूर्वीच कराची स्टेडियमला आग, कॉमेंट्री बॉक्स जळून खाक !

तसेच, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सुपर ओव्हरमध्ये लाहोरने प्रथम फलंदाजी करताना पाच धावा केल्या. पेशावरकडून वहाब रियाझने गोलंदाजी केली आणि लाहोरकडून फखर जमान आणि हॅरी ब्रुक फलंदाजी केली.

यानंतर पेशावरकडून शोएब मलिक (Shoaib Malik) आणि मोहम्मद हारिस फलंदाजीला आले. त्याचवेळी शाहीन आफ्रिदी लाहोरसाठी गोलंदाजी करायला आला. पहिल्या दोन चेंडूत चौकार मारत मलिकने पेशावरला विजय मिळवून दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com