Sarfaraz Khan and Musheer Khan with Father  Dainik Gomanyak
क्रीडा

Sarfaraz Khan पाठोपाठ धाकट्या भावाचाही डंका, 34 चौकार अन् 9 षटकारांसह ठोकली 'ट्रिपल सेंच्यूरी'

सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खानने हैदराबादविरुद्ध 34 चौकार आणि 9 षटकारांसह त्रिशतकी खेळी केली आहे.

Pranali Kodre

Musheer Khan: भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकिकडे सर्फराज खानची बॅट तळपत आहे. गेल्या तीन रणजी हंगामापासून तो दमदार फॉर्ममध्ये असून भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत आहे. असे असतानाच आता त्याचा धाकटा भाऊ मुशीर खानने देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकत दमदार कामगिरी केली आहे.

सर्फराजचा 17 वर्षीय भाऊ मुशीर खान सध्या 23 वर्षांखालील देशांतर्गत स्पर्धा कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. त्याने या स्पर्धेत मुंबईकडून हैदराबादविरुद्ध खेळताना पहिल्या डावात त्रिशतक झळकावण्याचा कारनामा केला.

मुंबईच्या जिमखाना ग्राउंडवर सुरु असलेल्या मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याती पहिल्या डावात मुशीरने 376 चेंडूंचा सामना करताना 339 धावांची ताबडतोड खेळी केली. त्याने या त्रिशतकी खेळीत तब्बल 34 चौकार आणि 9 षटकारांची बरसात केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेटही 93 च्या आसपास होता.

त्याने ही खेळी करताना कर्णधार अथर्व विनोद अंकोलेकरबरोबर 471 धावांची भागीदारीही केली. अथर्वनेही मुशीरची शानदार साथ देताना द्विशतकी खेळी केली. त्याने 249 चेंडूत 214 धावांची खेळी केली. या खेळीत अथर्वने 15 चौकार आणि 11 षटकार मारले. त्याचा जवळपास 85 चा स्ट्राईक रेट होता.

या दोघांच्या दमदार कामिगिरीमुळे मुंबईने त्यांचा पहिला डाव 8 बाद 704 धावांवर घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर हैदराबादने पहिल्या डावात 3 बाद 128 धावा केल्या आहेत.

(Sarfaraz Khan younger Brother Musheer Khan hits Triple Century against Hyderabad in COL CK Nayudu Trophy)

मुशीरने याआधीच मुंबईच्या वरिष्ठ संघाकडूनही पदार्पण केले असून 3 रणजी सामने खेळले आहेत. पण रणजी ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्याला 3 सामन्यांत 96 धावाच करता आल्या असून त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, सर्फराजची बॅट मात्र रणजी ट्रॉफीमध्ये चांगलीच तळपत आहे. त्याने नुकतेच दिल्लीविरुद्धच्या सामन्यात १२५ धावांची शतकी खेळी केली होती. त्याने 2022-23 रणजी ट्रॉफी स्पर्धेत आत्तापर्यंत 3 शतके आणि 1 अर्धशतक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT