Mumbai batsman Sarfaraz Khan
Mumbai batsman Sarfaraz Khan Dainik Gomantak

Sarfaraz Khan: 'सिलेक्टर्सने सांगितलेलं की...', टीम इंडियासाठी दुर्लक्षित राहिलेल्या सर्फराजचा खुलासा

टीम इंडियात संधी न मिळाल्याने निराश झालेल्या सर्फराज खानने मोठा खुलासा केला आहे.
Published on

Sarfaraz Khan: बीसीसीआयने शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी२० मालिकेसाठी, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड केली. परंतु, यातील कोणत्याही मालिकेसाठी मुंबईच्या सर्फराज खानला संधी मिळाली नाही. त्यामुळे बरीच चर्चा झाली.

सर्फराजने गेल्या तीन हंगामात दमदार कामगिरी केली आहे, त्याला जे सामने खेळायला या तीन वर्षात मिळाले, त्यात त्याने प्रत्येकवेळी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून द्विशतके आणि त्रिशतकही आले.

Mumbai batsman Sarfaraz Khan
Team India ची न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया मालिकांसाठी घोषणा, ईशान-सूर्याला कसोटीत संधी, तर रोहित-विराट...

त्याने आत्तापर्यंत 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 12 शतके आणि 9 अर्धशतकांसह 80.47 च्या शानदार सरासरीसह 3380 धावा केल्या. नाबाद 301 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. त्याने चालू 2022-23 रणजी ट्रॉफी हंगामातही 5 सामन्यांत 107.75 च्या सरासरीने 2 शतके आणि 1 अर्धशतकासह 431 धावा केल्या आहेत.

तसेच त्याने गेल्यावर्षीच्या रणजी हंगामात सर्वाधिक 982 धावा केल्या होत्या. त्यात त्याच्या 4 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याने इराणी ट्रॉफी 2022 सामन्यातही सर्वाधिक 138 धावा केल्या होत्या, तर त्याआधी झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही त्याने एका सामन्यात खेळताना 161 धावांची खेळी केलेली.

या कामगिरीनंतर त्याला भारताच्या कसोटी संघात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्याला ही संधी मिळाली नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. त्याने सांगितले की निवडकर्त्यांनी तो भारतीय संघात निवड होण्याच्या खूप जवळ आहे, असे सांगितले होते.

(I met the selectors, I was told that I will get opportunity in Bangladesh, says Sarfaraz Khan)

त्याला भारतीय संघात स्थान न मिळाल्याबद्दल बोलताना त्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले, 'जेव्हा संघाची घोषणा केली, तेव्हा माझे नाव त्यात नव्हते. मी खूप निराश झालो होतो. माझ्याजागी कोणीही असते, तरी निराशच झाले असते. कारण मला निवड होण्याची अपेक्षा होती.'

'मी त्यादिवशी पूर्ण दिवस निराश होतो, तेव्हा मी गुवाहाटीवरून दिल्लीला जात होतो. मी हे का आणि काय झाले याचा विचार करत होतो. मला खूप एकटे वाटत होते आणि मी रडलो देखील.'

सध्या मुंबई संघासह रणजी ट्रॉफी खेळत असलेल्या सर्फराजने असेही सांगितले की त्याने नंतर त्याचे वडील नौशाद यांना फोन केला. त्यामुळे ते दिल्लीला आले आणि त्यांनी सर्फराजला धीर दिला. त्याने त्यांच्याबरोबर सरावही केला. नौशाद हे देखील क्रिकेटपटू असून त्यांनीच त्यांची दोन्ही मुले सर्फराज आणि मुशीर यांना प्रशिक्षण दिले आहे. सध्या सर्फराज आणि मुशीर दोघेही मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतात.

Mumbai batsman Sarfaraz Khan
India vs Sri Lanka ODI: इतिहास घडला! भारताचा श्रीलंकेवर 317 धावांनी आजवरचा सर्वात मोठा विजय

तसेच त्याचे निवडकर्त्यांशी काही बोलणे झाले आहे का, यावर सर्फराज म्हणाला, 'बेंगलोरमध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीच्या (2021-22) अंतिम सामन्यादरम्यान मी शतक केले होते. त्यावेळी मी निवडकर्त्यांना भेटलो होतो. मला सांगितले होते की मला बांगलादेशमध्ये संधी मिळेल, त्यासाठी सज्ज राहा.'

'काहीदिवसांपूर्वीच मी चेतन शर्मा सरांना (निवड समीती अध्यक्ष) भेटलो. तेव्हा आम्ही मुंबईतील हॉटेलमध्ये चेक इन करत होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितले होते, निराश होऊ नको आणि माझी वेळ येईल. तुला संधी मिळेल. त्यामुळे जेव्हा मी आणखी एक महत्त्वाची खेळी केली, तेव्हा मला निवड होण्याची अपेक्षा होती, पण ठिक आहे.'

याबरोबरच सर्फराजने असेही सांगितले की तो पूर्ण तंदुरुस्त असून त्याने सर्व यो-यो टेस्टही पास केल्या आहेत. तसेच त्याने म्हटले की त्याच्यावर आलेल्या सर्व भूमिका त्याने निभावल्या आहेत, त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि यष्टीरक्षणही केले आहे. दरम्यान, तो म्हणाला की तो पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवकडून आदर्श घेईल आणि आशा आहे की त्याचीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी निवड होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com