Team India X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: सर्फराज, जुरेलला मिळणार पदार्पणाची संधी? तिसऱ्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची 'प्लेइंग-11'

India Predicted Playing XI: भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होणार आहे, या सामन्यातून सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांचे पदार्पण होण्याची शक्यता आहे.

Pranali Kodre

India vs England, 3rd Test Match at Rajkot, Predicted Playing XI:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) राजकोटला सुरू होणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर होणाऱ्या या सामन्याला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल.

तिसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे निश्चित मानले जात आहे. कारण पहिल्या दोन कसोटीत खेळलेल्या श्रेयस अय्यरला उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघात निवडण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर सर्फराज खानला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

तसेच भारताकडे देवदत्त पडिक्कलचाही पर्याय आहे. त्याला दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्याला मुकणाऱ्या केएल राहुलच्या जागेवर भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. परंतु पडिक्कलच्या आधी सर्फराजला पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे.

याशिवाय सलामीला कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल कायम राहू शकतो. तर विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत शुभमन गिल आणि रजत पाटीदार कायम राहू शकतात, त्यांना सर्फराजची साथ मिळू शकते.

त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की केएस भरतच्या जागेवर ध्रुव जुरेलला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. जुरेलने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीने प्रभावित केले आहे.

त्यामुळे जर त्याला संधी मिळाली, तर तो कशी कामगिरी करेल, हे पाहावे लागणार आहे. तसेच जर सर्फराज आणि जुरेल यांना राजकोट कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली, तर हे त्यांचे कसोटी पदार्पणही असेल.

जडेजाचेही पुनरागमन

हॅमस्ट्रिंगमुळे दुसऱ्या कसोटीला मुकलेल्या रविंद्र जडेजाने पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्येही पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचेही माहिती कुलदीप यादवने दिली होती.

तथापि, जर जडेजाचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले, तर मात्र अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव यांच्यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमधील आपली जागा सोडावी लागण्याचीच दाट शक्यता आहे. जर या दोघांनाही जडेजा आणि अश्विन यांच्यासह खेळवायचे झाल्यास भारताला एकाच वेगवान गोलंदाजाला खेळवावे लागेल.

पण असे होण्याची शक्यता कमी आहे. कारण मोहम्मद सिराजचेही भारतीय संघात पुनरागमन झाले असल्याने तो मुकेश कुमारच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता आहे. तसेच उपकर्णधार जसप्रीत बुमराह देखील संघात कायम असेल.

मालिकेत बरोबरी

या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. तसेच दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे सध्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झालेली आहे. त्यामुळे तिसरा सामना जो संघ जिंकेल, तो मालिकेत आघाडी घेईल. तसेच जर सामना अनिर्णित राहिला, तर मालिका 1-1 अशीच बरोबरीत राहिल.

तिसऱ्या कसोटीसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन

  • रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

Pooja Naik: 'देसाई, पार्सेकरांना पैसे दिल्‍याचे पुरावे माझ्‍या मोबाईलमध्‍ये'! पूजा नाईकचा दावा; Special Interview

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

SCROLL FOR NEXT