Sarfaraz Ahmed Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022: पाक चा माजी कर्णधार महिला पत्रकारावर भडकला, पराभवानंतर सुरु झाला वाद

Sarfaraz Ahmed: पाकिस्तानच्या आशिया कप 2022 ची सुरुवात भारताकडून मिळालेल्या पराभवाने झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: पाकिस्तानच्या आशिया कप 2022 ची सुरुवात भारताकडून मिळालेल्या पराभवाने झाली आहे. रोमहर्षक सामन्याच्या शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने 5 विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले. पाकिस्तानच्या या पराभवानंतर माजी कर्णधार सर्फराज अहमदने महिला पत्रकाराबद्दल एक ट्विट केले होते, ज्यानंतर आता वादाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, सर्फराजने (Sarfaraz Ahmed) ट्विटमध्ये म्हटले की, '17व्या षटकात स्लो ओव्हर रेटमुळे 5 फिल्डर सर्कलमध्ये होते. नॅशनल टीव्हीवरील लढतीच्या सामन्यानंतर एका तथाकथित महिला पत्रकाराने पाकिस्तान संघाला शिव्याशाप दिला. धावाही नाही आणि झेलही नाही. कमाल है भाई.'

दुसरीकडे, सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याने त्याचा फटका बसला. त्यामुळे शेवटच्या तीन षटकांमध्ये 30 यार्डच्या सर्कलमध्ये 4 ऐवजी 5 फिल्डर्संना तैनात करावे लागले.

तसेच, आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा (Pakistan) पुढील सामना 2 सप्टेंबर रोजी हाँगकाँग (Hong Kong) विरुद्ध आहे, तर भारतीय संघ (Team India) बुधवारी, 31 ऑगस्ट रोजी या संघासोबत आपला पुढील सामना खेळणार आहे. दोन्ही संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करतील अशी अपेक्षा आहे, असे जर झाल्यास चाहत्यांना 4 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Virat Kohli Debut: रन मशीन, चेस मास्टर... आजच्याच दिवशी क्रिकेट विश्वाला मिळाला 'किंग', 17 वर्षांच्या प्रवासातील विराटचे 3 'सुवर्ण क्षण'

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT