Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

संजू सॅमसनला बीसीसीआयने न्याय द्यावा; सोशल मीडियावरुन चाहत्यांची मागणी !

न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) मंगळवारी भारतीय संघाची घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) मंगळवारी भारतीय संघाची (Indian team) घोषणा केली. ही तीन सामन्यांची मालिका 17 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी काही नवीन चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले असताना, स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे (Sanju Samson) नाव न आल्याने चाहते निराशा झाले आहेत. या मालिकेसाठी ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे बोर्डाने संजू सॅमसनला बाहेरचा रस्ता दाखवला.

बीसीसीआयने या मालिकेसाठी अनेक बड्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव अनेक नवख्या चेहऱ्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी निवडण्यात आले आहे. या सगळ्यात संजू सॅमसनला संघात स्थान न दिल्याने चाहत्यांमध्ये आपली नाराजी दर्शवली आहे. सोशल मीडियावरही त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बीसीसीआय ज्या प्रकारे इशान किशन आणि ऋषभ पंत यांना पाठिंबा देत आहे, तसा संजू सॅमसनला पाठिंबा देत नाही, असे चाहत्यांना वाटते.

संजू सॅमसनसाठी चाहत्यांचा ट्रेंड सुरु झाला

न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेत संजू सॅमसनची निवड न झाल्यामुळे संतप्त चाहत्यांनी सोशल मीडियावर #justiceforsanjusamson (Justice for Sanju Samson) ट्रेंड सुरु केला. चाहत्यांनी बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, सॅमसनसारख्या फलंदाजाला ते संघाबाहेर कसे ठेवू शकतात. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने सातत्याने उत्तम कामगिरी करत असताना सॅमसनला टी-20 विश्वचषकातही संधी देण्यात आली नाही.

संजू सॅमसन हा IPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज होता. त्याने 14 सामन्यांत 136.72 च्या स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या. यासोबतच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत. सातत्यपूर्ण कामगिरी करुनही त्याचे नाव टीम इंडियामध्ये का नाही, असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

अनेक चाहत्यांचे विशेषत: संजू सॅमसनच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, निवडकर्ते सॅमसनशी भेदभाव करत आहेत. काही क्रिकेट चाहते संजू सॅमसनचे धावगतीचे आकडे शेअर करत आहेत, तर काही त्याच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक करत आहेत. सॅमसन हा एक चांगला यष्टिरक्षक तसेच चांगला क्षेत्ररक्षक आहे. बुधवारी सकाळी, त्याने कोणत्याही कॅप्शनशिवाय एक उत्कृष्ट झेल घेतानाचे काही फोटो शेअर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT