ENG vs IND: संघात स्थान टिकविण्यासाठी ही माझी शेवटची संधी होती; रोहितचा मोठा खुलासा

परदेशात खेळत असताना काही गोष्टी सोप्या नसतात. तसेच वेगळी प्रक्रिया असते ती मला फॉलो करायची आहे. मी छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असतो.
Rohit sharama
Rohit sharama dainik gomantak
Published on
Updated on

IND vs ENG 4th Test: भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या (Test match)तिसऱ्या दिवसानंतर रोहित शर्माने खुलासा एक मोठा खुलासा केला आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात द ओव्हल मैदानावर(At The Oval) खणखणीत शतक ठोकत त्याने आपले स्थान आणखी पक्के केले आहे.

Rohit sharama
Eng Vs Ind: रोहित - पुजाराने भारताचा डाव सावरला

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, कसोटी संघात स्थान टिकविण्यासाठी ही माझी शेवटची संधी होती. कारण 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये संघात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी मी एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे, कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करायची अन्यथा कसोटी क्रिकेट खेळणे सोडून द्यायचे असे त्याने सांगितले.

रोहितने शनिवारी 127 षटकांची शानदार खेळी करून त्याच्या कारकिर्दितील 8 वे शतक (8th century)केले आहे. तर परदेशी भूमीवरील हे त्याचे पहिलेच शतक आहे. तो पुढे म्हणाला, माझ्या या निर्णयाकडे मागे वळून पाहताना हा निर्णय उत्तम आणि महत्त्वाचा होता कारण ही माझ्यासाठी शेवटची संधी होती. मी फलंदाजीसाठी इतर स्थान मिळवण्याचा प्रयत्न करीत होता.

पण जेव्हा मला डावाची सुरुवात करण्याची ऑफर मिळाली तेव्हा मला याची जाणीव होती, कारण व्यवस्थापनामध्ये या आधीच मी कसोटीत देखील डाव सुरुवात करावी याबाबत चर्चा सुरु होती. म्हणून, मी मानसिकदृष्ट्या मला हे आव्हान स्वीकारण्यास तयार करत होतो. डावाच्या सुरुवातील मी कसे चांगले खेळू शकतो याचा विचार मी करत होतो. मला माहित होते की ही माझी शेवटची संधी असेल. मी यशस्वी झालो नसतो तर काहीही होऊ शकले असते.

परदेशात खेळत असताना काही गोष्टी सोप्या नसतात. तसेच वेगळी प्रक्रिया असते ती मला फॉलो करायची आहे. मी छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असतो. यावेळी देखील मी तेच केले. डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाल्याने मला आनंद झाला. असेही रोहितने नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com