Sanju Samson X/BCCI
क्रीडा

SA vs IND: सॅमसनचा पदार्पण करून आठ वर्ष झाल्यानंतर अखेर शतकी तडाखा! विराट-रोहितच्या पंक्तीत सामील

Sanju Samson Century: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळताना संजू सॅमसनने शतकी खेळी केली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 3rd ODI at Paarl, Sanju Samson Century

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना पार्लला गुरुवारी (२१ डिसेंबर) खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज संजू सॅमसनने शतक झळकावले आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून सलामीला साई सुदर्शन (10) आणि रजत पाटीदार (22) यांनी फलंदाजी केली. पण हे दोघे स्वस्तात बाद झाले.

मात्र त्यानंतर संजू सॅमसनने आधी कर्णधार केएल राहुलला (21) आणि मग तिलक वर्माला (52) साथीला घेतले. त्यांच्याबरोबर मोठ्या भागीदारीऱ्या करत भारताची धावसंख्या त्याने 200 पार पोहचवली. त्याने केएल राहुलबरोबर 52 धावांची आणि तिलकबरोबर 116 धावांची भागीदारी केली.

याबरोबरच त्याने 110 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक ठरले आहे.

सॅमसनने 2015 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर 2021 साली त्याला वनडेत पदार्पणाची संधी मिळाली.

त्यानंतर त्याने आत्तापर्यंत 24 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले, तसेच 15 वनडे खेळले. मात्र, त्याला शतक करता आले नव्हते. अखेर 16 वा वनडे सामना खेळताना त्याने तिहेरी आकडा पार केला.

दरम्यान, शतक पूर्ण केल्यानंतर सॅमसनने 46 व्या षटकात लिझाद विल्यम्सच्या गोलंदाजीवर रिझा हेंड्रिक्सकडे झेल देत विकेट गमावली. सॅमसनने 114 चेंडूत 108 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले.

आठवा भारतीय

सॅमसन दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत शतक करणारा आठवा भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापूर्वी विराट कोहलीने 3 शतके केल आहेत, तर शिखर धवन, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युसूफ पठाण आणि वुर्केरी रमन यांनी प्रत्येकी एक शतक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT