Sanjay Manjrekar Criticizes Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: "सूर्या अती करतो...!", विराटनंतर मांजरेकरांच्या निशाण्यावर भारतीय कर्णधार, संथ खेळीवरुन साधला निशाणा; व्हिडिओ व्हायरल

Sanjay Manjrekar Criticizes Suryakumar Yadav: विराट कोहलीवर केलेल्या टिप्पणीमुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर आता मांजरेकर यांनी भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर निशाणा साधला

Manish Jadhav

Sanjay Manjrekar Criticizes Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर हे आपल्या रोखठोक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. अलीकडेच विराट कोहलीवर केलेल्या टिप्पणीमुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर आता मांजरेकर यांनी भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यावर निशाणा साधला आहे.

सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सूर्यकुमारच्या फलंदाजीच्या शैलीवर मांजरेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेषतः जेव्हा टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळतो, ही बाब मांजरेकर यांना खटकली. अमेरिकेविरुद्धच्या सामन्याचा संदर्भ देत त्यांनी सूर्याच्या बदललेल्या खेळावर टीका केली.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये मांजरेकर यांनी सूर्याच्या गेमचे विश्लेषण करताना सांगितले की, सूर्याच्या फलंदाजीत सध्या असा काही बदल दिसत आहे जो त्यांना फारसा पटलेला नाही. वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध जेव्हा भारताची अवस्था 6 बाद 77 अशी बिकट झाली होती, तेव्हा सूर्याने आपला नैसर्गिक खेळ बदलून संयमी फलंदाजी केली आणि 49 चेंडूत 84 धावांची खेळी करत संघाला सावरले. त्या सामन्यात त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कारही मिळाला.

मात्र, मांजरेकर यांच्या मते, तेव्हापासून सूर्या हा बदल गरजेपेक्षा जास्तच अंमलात आणत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात जेव्हा भारताने काही विकेट्स गमावल्या, तेव्हा सूर्याने आपले 'शटर' पूर्णपणे खाली ओढले होते, म्हणजेच तो अतिशय संथ खेळला, जे टी-20 च्या दृष्टीने घातक ठरु शकते, असे मांजरेकर यांचे मत आहे.

2026 च्या या विश्वचषकात भारतीय फलंदाजीची वरची फळी एकाच वेळी संघर्ष करताना दिसत आहे, अशा वेळी मधल्या फळीत सूर्यावर मोठी जबाबदारी आहे. सूर्याने या वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 5 सामन्यांत 242 धावा कुटून दिमाखात केली होती, मात्र विश्वचषकात त्याची लय काहीशी डळमळीत झाल्याचे दिसते.

नामीबियाविरुद्ध 12, पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 32 आणि नेदरलँड्सविरुद्ध 34 धावांच्या त्याच्या खेळींवरून तो आक्रमक होण्याऐवजी खेळपट्टीवर फक्त टिकून राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे मांजरेकर यांनी अधोरेखित केले. 2025 मधील खराब कामगिरीनंतर पुनरागमन करणाऱ्या 35 वर्षीय सूर्यासाठी हे आव्हान मोठे आहे. आता 22 फेब्रुवारीला अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात कर्णधार सूर्या मांजरेकर यांच्या टीकेला आपल्या बॅटने चोख उत्तर देतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: दुर्दैवी घटना! विचित्र अपघातात बोरीतील तरुण ठार; गोव्यातील अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच

ईराणचा युरोपला दे धक्का! युरोपियन युनियनच्या नौदल अन् हवाई दलाला केलं 'दहशतवादी' घोषित; आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 5149 जागा भरणार; कसा करायचा अर्ज? वाचा..

IND vs SA: अश्विनला कोण धोबीपछाड देणार? बुमराह आणि अर्शदीपमध्ये 'नंबर 1' साठी काँटे की टक्कर; द. आफ्रिकेविरुद्ध करणार धमाका

Video: जबाबदारी कुणाची? पर्यटकांची की स्थानिकांची? मोरजीतील स्वच्छ केलेली जागा पुन्हा भरली कचऱ्याने; नेटकरी झाले संतप्त

SCROLL FOR NEXT