Sania Mirza emotional post about her retirement  Dainik Gomantak
क्रीडा

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाची मोठी घोषणा, 'माझ्या करिअरचा शेवट ऑस्ट्रेलियन ओपन...'

सानिया मिर्झाने भावनिक पोस्ट करत निवृत्तीबद्दल मोठी घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Sania Mirza Retirement: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने शुक्रवारी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. तिने यामध्ये तिच्या कारकिर्दीतील अखेरचे काही सामने खेळणार असल्याचे तिने स्पष्ट केले असून 16 जानेवारीपासून सुरु होणारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा तिच्या कारकिर्दीतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असल्याच तिने स्पष्ट केले आहे.

पण, 36 वर्षीय सानियाने तिच्या पोस्टमध्ये हे देखील स्पष्ट केले की ती फेब्रुवारीमध्ये दुबई ओपन स्पर्धेनंतर निवृत्ती घेईल. तिने यापूर्वीच दुबई ओपनमध्ये ती अखेरचा सामना खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते.

सानियाने 'लाईफ अपडेट' असे कॅप्शन टाकत पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की 30 वर्षांपूर्वी 6 वर्षाची हैदराबादमधील नासर शाळेतील मुलगी निझाम क्लबमध्ये टेनिस कसा खेळायचा हे शिकायला तिच्या आईबरोबर गेली होती आणि कोचबरोबर भांडली होती. कोचने ती खूप लहान आहे, असे सांगितले होते. त्यावेळीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष सुरू झाला होता.'

तिने पुढे असेही लिहिले की अनेक अडथळ्यानंतरही ग्रँड स्लॅममध्ये खेळण्याचे आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहाण्याची हिंमत तिने केली. तिने ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याबद्दल आणि त्यात विजेतीपदे मिळवल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.

तसेच तिने असेही म्हटले की देशासाठी पदक मिळवणे हा तिच्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. तिने लिहिले की 'कोट्यवधी लोकांना आदरणीय असलेला तिरंगा उंच फडकवला जातो, कारण मी काहीतरी यश मिळवले आहे, हे लिहितानाच या भावना डोळ्यात आनंदाश्रू आणि अंगावर काटे आणत आहेत.'

दरम्यान, सानियाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'माझा ग्रँडस्लॅम प्रवास 2005 साली ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरु झाला होता. त्यामुळे माझ्या कारकिर्दीचा शेवट या ग्रँडस्लॅमने करणे सर्वोत्तम असेल.'

'पहिला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन खेळल्यानंतर 18 वर्षांनी या स्पर्धेत शेवटचे खेळण्यासाठी मी सज्ज होत आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये दुबई ओपन स्पर्धा आहे. यावेळी अभिमान आणि कृतज्ञतेने भरलेल्या अनेक भावना माझ्या मनात येत आहेत.'

'मी गेल्या 20 वर्षात जे काही यश मिळवले, त्याबद्दल मला अभिमान आहे आणि मी इतक्या वर्षात ज्या आठवणी बनवल्या त्याबद्दल कृतज्ञ आहे. पण सर्वात महत्त्वाची आठवण, जी मी आयुष्यभर जपेल, ती म्हणजे जेव्हाही मी माझ्या कारकिर्दीत यशाचे टप्पे पार केले आणि विजय मिळवले, तेव्हा माझ्या देशवासियांच्या चेहऱ्यावर असलेला अभिमान आणि आनंद.'

(Sania Mirza emotional post about her retirement )

सानिया ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मध्ये कझाकिस्तानच्या ऍना डॅनिलिनाबरोबर दुहेरी सामने खेळणार आहे. तिने 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिचे पदार्पण केले होते.

तिने तिच्या कारकिर्दीत 6 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने 2009 मध्ये मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 साली फ्रेंच ओपन आणि 2014 साली अमेरिकन ओपन हे ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवली आहेत.

तसेच तिने महिला दुहेरीत 2016 साली ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले होते. तसेच तिने 2015 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेतही विजेतीपदे जिंकली होती.

सानियाला आत्तापर्यंत अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, पद्म पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT