Sanath Jayasuriya & Muttiah Muralitharan Dainik Gomantak
क्रीडा

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

Sanath Jayasuriya & Muttiah Muralitharan Record: श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासातील दोन दिग्गज खेळाडू विस्फोटक फलंदाज सनथ जयसूर्या आणि फिरकीचा जादूगार मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर असाच एक अजब आणि ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला.

Manish Jadhav

Sanath Jayasuriya & Muttiah Muralitharan Record: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा असे रेकॉर्ड घडतात, जे पाहायला अत्यंत सामान्य वाटतात, परंतु त्यामागचे वास्तव थक्क करणारे असते. श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासातील दोन दिग्गज खेळाडू विस्फोटक फलंदाज सनथ जयसूर्या आणि फिरकीचा जादूगार मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर असाच एक अजब आणि ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला. या दोघांनी दशकानुदशके श्रीलंकेसाठी एकत्र क्रिकेट खेळले, शेकडो विजय मिळवून दिले, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या कारकिर्दीत या दोघांनी कधीही मैदानावर एकत्र फलंदाजी केली नाही. हा विक्रम केवळ कसोटीपुरता मर्यादित नसून तो एकदिवसीय क्रिकेटमध्येही कायम राहिला.

सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि मुथय्या मुरलीधरन यांनी मिळून एकूण 90 कसोटी सामने एकत्र खेळले आहेत. जयसूर्या हा सलामीचा फलंदाज होता, तर मुरलीधरन हा शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असे. 90 कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ प्रवासात अशी एकही वेळ आली नाही, जेव्हा जयसूर्या खेळपट्टीवर असताना मुरलीधरन फलंदाजीला आला असेल.

सहसा जयसूर्या बाद झाल्यानंतरच मुरलीधरनची पाळी येत असे किंवा मुरलीधरन येईपर्यंत जयसूर्याचा डाव संपलेला असे. मुरलीधरन त्याच्या अतरंगी फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याने 133 कसोटीत 800 बळींचा विश्वविक्रम केला असला, तरी फलंदाजीत त्याने केवळ 1261 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, जयसूर्याने 110 कसोटीत 14 शतकांच्या मदतीने 6973 धावांचा डोंगर उभा केला.

ही अनोखी आकडेवारी केवळ कसोटीपुरती थांबत नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तर या दोघांनी तब्बल 307 सामने एकत्र खेळले आहेत. 307 सामने ही खूप मोठी संख्या आहे, तरीही या फॉरमॅटमध्येही या दोघांची जोडी कधीच मैदानात एकत्र दिसली नाही. सलामीवीर म्हणून जयसूर्याने 10 हजारांहून अधिक धावा कुटल्या, पण मुरलीधरन फलंदाजीला येण्यापूर्वीच जयसूर्या पॅव्हेलियनमध्ये परतलेला असायचा. 397 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (कसोटी + वनडे) एकत्र खेळूनही एकदाही 'पार्टनरशिप' न होणे, हा जागतिक क्रिकेटमधील एक अत्यंत दुर्मिळ आणि नकोसा वाटणारा पण सत्य विक्रम आहे.

मुरलीधरनची फलंदाजी पाहणे चाहत्यांसाठी नेहमीच मनोरंजनाचा विषय असायचा, कारण तो अत्यंत वेगळ्या शैलीत फटकेबाजी करायचा. मात्र, जयसूर्यासारख्या महान फलंदाजासोबत त्याची जोडी न जमणे हे क्रिकेटमधील एक मोठे आश्चर्य मानले जाते. अशा प्रकारच्या अनपेक्षित आणि अनोख्या विक्रमांची चर्चा आजही क्रिकेट वर्तुळात रंगते. दोन दिग्गज एकाच संघातून वर्षानुवर्षे खेळूनही कधीच 'बॅटिंग पार्टनर' होऊ शकले नाहीत, हे ऐकायला जरी नवल वाटत असले, तरी क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये हे वास्तव कायमस्वरुपी नोंदवले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

50 ओव्हरची मॅच, 35 धावा, 10 विकेट्स! वनडे क्रिकेटमधील सर्वात 'लाजिरवाणा' रेकॉर्ड; नेपाळ अन् श्रीलंकेच्या गोलंदाजांनी रचला इतिहास

"Hey, Stupid Trump" लिहून इराणनं डागली क्षेपणास्त्रे, ट्रम्प यांच्या 'अल्टिमेटम'ची उडवली खिल्ली; होर्मुजच्या वादावरुन डिवचलं VIDEO

IFL 2026: धेंपो क्लबसमोर आणखी एक कठीण आव्हान, शिलाँग लाजाँगविरुद्ध फातोर्डा येथे लढत

SCROLL FOR NEXT