

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात रविवारी चिखली-वास्को येथील मैदानावर फिरकी गोलंदाजांची ‘दहशत’ राहिली. चौगुले स्पोर्टस क्लब विरुद्ध पणजी जिमखाना लढतीत दिवसभरात फिरकीच्या पूर्ण अधीन खेळपट्टीवर २२ विकेट्स गारद झाल्या.
पणजी जिमखान्याचा पहिला डाव ऑफस्पिनर शुभम देसाई याने १०१ धावांत गुंडाळला. शुभमने अवघ्या २९ धावांत ७ गडी बाद केले. एकवेळ पणजी जिमखान्याची ७ बाद ३९ धावा अशी दारुण अवस्था झाली होती. नंतर मोहित रेडकर (६-६०) याच्या ऑफस्पिन फिरकीसमोर चौगुले क्लबची घसरगुंडी उडाली होती.
मात्र तळात वेदांत डब्राल (२९), फेलिक्स आलेमाव (३७) व शुभम तारी (नाबाद ३६) यांनी खिंड लढविल्यामुळे चौगुले क्लबने ८ बाद ११२ धावांवरून सर्वबाद २१३ धावा करून पहिल्या डावात ११२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी संपादन केली. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर शुभम देसाई व डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केल्यामुळे पणजी जिमखान्याची दुसऱ्या डावात २ बाद १८ धाव अशी नाजूक स्थिती होती.
संक्षिप्त धावफलक
पणजी जिमखाना, पहिला डाव ः २९.१ षटकांत सर्वबाद १०१ (शदाब खान ४५, शुभम तारी ३-३०, शुभम देसाई १४.१-६-२९-७) व दुसरा डाव ः ५ षटकांत २ बाद १८ (शुभम देसाई १-६, दर्शन मिसाळ १-११) विरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः ५२.४ षटकांत सर्वबाद २१३ (मधूर यादव ४२, वेदांत डब्राल २९, फेलिक्स आलेमाव ३७, शुभम तारी नाबाद ३६, मोहित रेडकर २२.४-२-६०-६, विजेश प्रभुदेसाई २-५१, शदाब खान २-६३).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.