All Goa Rapid Chess Competition Dainik Gomantak
क्रीडा

All Goa Rapid Competition: साईरुद्र नागवेकर बुद्धिबळात विजेता; रुबेन कुलासो उपविजेता, ऋषिकेश परब तिसरा

किशोर पेटकर

All Goa Rapid Chess Competition: अखिल गोवा रॅपिड फिडे मानांकन प्रेमलता ओमप्रकाश अगरवाल स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत बार्देश तालुक्याच्या साईरुद्र नागवेकर याने विजेतेपद मिळविले.

सासष्टी तालुक्याचा द्वितीय मानांकित रुबेन कुलासो याला उपविजेतेपद, तर मुरगाव तालुक्याचा ऋषिकेश परब याला तिसरा क्रमांक मिळाला.

स्पर्धेत नववे मानांकन असलेल्या साईरुद्र याने नऊ फेऱ्यांतून साडेआठ गुणांची कमाई केली. रविवारी त्याने सलग तीन विजय मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

सातव्या फेरीत एड्रिक वाझ, आठव्या फेरीत अस्मिता रे, तर नवव्या फेरीत जोशुआ तेलिस याच्यावर साईरुद्रने विजय नोंदविला. त्याला १०००० रुपये व करंडक बक्षिसादाखल मिळाला.

उपविजेत्या रुबेनला ७००० रुपये व करंडक, तिसऱ्या क्रमांकावरील ऋषिकेशला ५००० रुपये व करंडक मिळाला.

अथर्व काटकर, एड्रिक वाझ, अस्मिता रे, राचेल परेरा, नीरज सारिपल्ली, पार्थ साळवी, जोशुआ तेलिस यांना अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळाला.

अनीश नाईक, आर्यन रायकर, शुभ बोरकर, आलेक्स सिक्वेरा, आर्यव्रत नाईक देसाई, जी. माधवन, अनिकेत एक्का, किरण चोपडेकर, श्रीया पाटील, सरस पोवार यांना अनुक्रमे अकरा ते विसावा क्रमांक प्राप्त झाला.

नक्ष आर्सेकर (उत्कृष्ट बिगरमानांकित खेळाडू), एम. सामी (उत्कृष्ट व्हेटरन), ड्विनी फर्नांडिस (१५ वर्षांखालील उत्कृष्ट महिला) यांनाही बक्षीस मिळाले.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, युनियन बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख आशिष मालविय, स्पर्धेचे पुरस्कर्ते राकेश अगरवाल, बीपीएस क्लबचे अध्यक्ष संतोष जॉर्ज, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी, सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष दिलीप वेर्णेकर, उपाध्यक्ष दामोदर जांबावलीकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

आशेष केणी स्पर्धेचे मुख्य आर्बिटर होते. त्यांना ज्योत्स्ना सारिपल्ली, सुधाकर पतगर, रिदिकेश वेर्णेकर यांचे साह्य लाभले.

देश-विदेशातील खेळाडू सहभागी

स्पर्धेत २४६ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला. यामध्ये गोव्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील, तसेच रशिया व हंगेरी या देशातील काही स्पर्धकही होते. स्पर्धेत ८३ खेळाडू मानांकित होते.

गोवा बुद्धिबळ संघटना आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेने ही स्पर्धा मडगाव येथील बीपीएस स्पोर्टस क्लबमध्ये घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT