SAFF Championship Dainik Gomantak
क्रीडा

SAFF Championship: यजमान भारताला आता खुणावतेय सहावे विजेेतेपद, फातोर्ड्यात बुधवारी स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भूतानशी गाठ

SAFF Womens Championship India vs Bhutan semi final: सॅफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) महिला फुटबॉल स्पर्धा सर्वाधिक पाच वेळा जिंकलेल्या भारतीय संघासमोर यावेळी उपांत्य फेरीत भूतानचे आव्हान असेल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सॅफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) महिला फुटबॉल स्पर्धा सर्वाधिक पाच वेळा जिंकलेल्या भारतीय संघासमोर यावेळी उपांत्य फेरीत भूतानचे आव्हान असेल. यजमान संघाला आता सहावे विजेतेपद खुणावत आहे.

दुसरा उपांत्य सामना बांगलादेश व नेपाळ यांच्यात खेळला जाईल. दोन्ही लढती फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी (ता. ३) होतील.

भारताला २०२२ व २०२४ मध्ये सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली नव्हती. २०१९ मध्ये अखेरच्या वेळेस अंतिम फेरी गाठताना त्यांनी विजेतेपद पटकावले होते. यावेळी क्रिस्पिन छेत्री यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने ‘ब’ गटात दोन्ही सामने सहजपणे जिंकताना तब्बल १४ गोल नोंदविले असून एकही गोल स्वीकारलेला नाही.

भारताने मालदीवचा ११-० असा धुव्वा उडविल्यानंतर रविवारी रात्री गतविजेत्या बांगलादेशला ३-० असे नमवून गटात अव्वल स्थान मिळविले. स्पर्धेच्या मागील दोन उपांत्य लढतीतील पराभवाचा वचपाही यजमान संघाने यावेळी काढला.

अ गटात नेपाळने दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थान मिळविले, तर भूतानला एका विजयासह दुसरा क्रमांक मिळाला. भूतानने पहिल्याच लढतीत नेपाळला विजयासाठी १-० असे झुंजविले होते, त्यामुळे उपांत्य लढतीत भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांना निश्चितच कमी लेखणार नाही. श्रीलंकेवर भूतानने ४-० असा दणदणीत विजय मिळविला होता. फिफाच्या जागतिक महिला क्रमवारीत भारत ६९व्या, तर भूतान १६४व्या क्रमांकावर आहे.

बांगलादेशविरुद्ध लढतीत भारताची मध्यफळीतील खेळाडू सॅनफिडा नोंग्रुम सामन्याची मानकरी ठरली होती. स्पर्धेच्या गटसाखळीतील दोन्ही सामन्यांच्या तुलनेत उपांत्य लढतीत अधिक चांगला खेळ करण्याची ग्वाही तिने सामन्यानंतर दिली.

नेपाळी फुटबॉलप्रेमींचा उत्साह!

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेकडे गोमंतकीय फुटबॉलप्रेमींनी पाठ फिरविली असली, तरी नेपाळच्या संघाला त्यांच्या देशातील चाहत्यांनी दिलेले प्रोत्साहन उत्साहवर्धक ठरले. त्यांच्या आवाजी पाठिंब्यामुळे फुटबॉल सामना स्टेडियमवर सुरू असल्याचे वातावरण निर्माण झाले.

रविवारी सुट्टीच्या दिवशी गोव्यात नोकरीनिमित्त असलेल्या नेपाळी फुटबॉलप्रेमींनी स्टेडियम दणाणून सोडले. सुमारे दोनशे चाहत्यांचा ‘आवाज’ नेपाळच्या संघाचे मनोबळ उंचावणारे ठरले. त्या बळावर त्यांनी श्रीलंकेला २-० असे नमवून दोन्ही सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. यजमान भारतीय संघ मात्र दोन्ही सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

खरी कुजबुज: उच्चशिक्षितही फसतात

Goa Investigation: सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप रखडलेलाच; आत्महत्येच्या प्राथमिक संशयानंतरही पडद्यामागचे गूढ वाढेना

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

Panaji: महापालिकेचा माणुसकीचा हात! बेघर आणि भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केली विशेष हेल्पलाईन

SCROLL FOR NEXT