SAFF Championship Dainik Gomantak
क्रीडा

SAFF Championship: भारतीय महिला सहाव्यांदा अंतिम फेरीत, भूतानवर 1-0 फरकाने विजय; विजेतेपदासाठी गतविजेत्या बांगलादेशचे आव्हान

SAFF Womens Championship 2026 Final: भारताने अपेक्षेनुसार सॅफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) महिला स्पर्धेची सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली, पण त्यासाठी संघर्ष करावा लागला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: भारताने अपेक्षेनुसार सॅफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) महिला स्पर्धेची सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली, पण त्यासाठी संघर्ष करावा लागला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी रात्री झालेल्या उपांत्य लढतीत यजमान संघाला भूतानविरुद्ध अखेरीस १-० या निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. उत्तरार्धात सॅनफिडा नाँग्रुम हिने केलेला गोल निर्णायक ठरला.

विजेतेपदासाठी आता पाचवेळच्या विजेत्या भारतीय महिला संघासमोर गतविजेत्या बांगलादेशचे आव्हान असेल.पहिल्या उपांत्य लढतीत बांगलादेशने नेपाळला २-१ संघाने नमविले. सामन्याच्या ५८व्या मिनिटास भारताने आघाडी घेतली. भूतानची गोलरक्षक संगीता मोंगेर हिने परतावलेल्या चेंडूवर भारतीय खेळाडूने चेंडूवर ताबा राखत हेडिंगद्वारे सॅनफिडा नाँग्रुम हिला गोल करण्याची संधी प्राप्त करून दिली.

मध्यफळीत खेळणाऱ्या मेघालयातील शिलाँग येथील २१ वर्षीय खेळाडूने उजव्या पायाच्या ताकदवान फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षकास चकविले. सॅनफिडा हिचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी फिफाचे जागतिक महिला मानांकन लक्षात घेता, ६९व्या क्रमांकावरील भारतीय संघ भूतानवर निर्विवाद वर्चस्व राखण्याचे संकेत होते, परंतु १६४ व्या क्रमांकावरील संघाने यजमान संघावर दक्ष पहारा ठेवत जास्त मोकळीक दिली नाही.

भारतीय प्रशिक्षक क्रिस्पिन छेत्री यांनी संघात बदल केले, पण आक्रमणाच्या दृष्टीने ते फलदायी ठरले नाहीत. सामन्यात गमावलेल्या संधी भारतीय संघासाठी चिंताजनक ठरल्या. पूर्वार्धात सौम्या गुगुलोथ हिला गोल करणे शक्य होते, परंतु तिने फटका थेट प्रतिस्पर्धी गोलरक्षक संगीता मोंगेर हिच्या हाती मारला. त्यापूर्वी यजमान संघ थोडक्यात बचावला होता.

भूतानच्या युगिएन ल्हामो हिने गोलनेटच्या दिशेने आक्रमक फटका मारला होता, मात्र ऐनवेळी भारतीय गोलरक्षक ई. पांथोई चानू हिने चेंडूपर्यंत पोहचत संकट दूर केले. पेरू देशातील अलियान्झा लिमा क्लबतर्फे खेळणारी मनीषा कल्याण मंगळवारी गोव्यात दाखल झाली. उत्तरार्धाच्या सुरवातीस ती बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरली.

आकडेवारीत...

सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारताचा भूतानवर सलग तिसरा विजय

यापूर्वी २०१० मध्ये १८-०, तर २०१२ मध्ये ११-० फरकाने विजय

भारताचे यंदा स्पर्धेतील ३ सामन्यांत क्लीन शीट्स राखताना १५ गोल

सॅनफिडा नाँग्रुम हिचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल वैयक्तिक दुसरा गोल

भारत सहाव्यांदा अंतिम फेरीत, यापूर्वी पाच वेळा विजेते (२०१०, २०१२, २०१४, २०१६, २०१९)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT