Indian Football team Dainik Gomantak
क्रीडा

SAFF Championship Final: सुनील छेत्रीची टीम इंडिया 9 व्यांदा जिंकणार ट्रॉफी? कधी अन् केव्हा होणार फायनल, घ्या जाणून

SAFF Championship: भारत विरुद्ध कुवेत संघात अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

SAFF Championship 2023 Final, India vs Kuwait : दक्षिण आशियाई महासंघ अजिंक्यपद स्पर्धेच्या (SAFF Championship) अंतिम सामन्यात भारत आणि कुवेत संघाने प्रवेश मिळवला आहे. या दोन फुटबॉल संघात आता मंगळवारी (4 जुलै) अंतिम सामना रंगणार आहे.

भारतीय संघाने दोन आठवड्यांपूर्वीच म्हणजेच 18 जून रोजी इंटरकॉन्टीनेंटल कप जिंकला आहे. त्यामुळे सुनील छेत्रीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.

तसेच भारतीय संघ तब्बल 9 व्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी उत्सुक असेल. तसेच कुवेत पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारताने 1993, 1997,1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021 साली ही स्पर्धा जिंकली आहे.

साखळी फेरीत भिडले भारत आणि कुवेत

या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि कुवेत आमने सामने आले होते. त्यावेळी त्या सामन्यात 1-1 अशी बरोबरी झाली होती. याच सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वादही झाल्याचे पाहायला मिळले होते. तसेच याच सामन्यात भारताचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना रेड कार्ड दाखवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर दोन सामन्यांची बंदी आली.

मुख्य प्रशिक्षकांशिवाय खेळणार भारत

दरम्यान, स्टिमॅक यांच्यावर दोन सामन्यांची बंदी असल्याने ते उपांत्य सामन्यातीही भारतीय संघासाठी उपलब्ध राहू शकले नव्हते. आता ते अंतिम सामन्यातही उपलब्ध नसणार आहेत. त्यामुळे भारतासाठी अंतिम सामन्यात सहाय्यक प्रशिक्षक महेश गवळी हे मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावतील.

कुवेतचे कडवे आव्हान

भारत आणि कुवेत आत्तापर्यंत 4 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील २ सामन्यांत कुवेतने विजय मिळवला आहे, तर भारताने एकदा विजय मिळवला असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे हा इतिहास पाहाता भारतासमोर कुवेतचे कडवे आव्हान असणार आहे.

कधी आणि कुठे होणार भारत विरुद्ध कुवेत संघातील अंतिम सामना?
भारत विरुद्ध कुवेत संघातील अंतिम सामना ४ जुलै २०२३ रोजी बंगळुरूमधील श्री कांतिरवा स्टेडियमवर होणार आहे.
किती वाजता सुरू होणार भारत विरुद्ध कुवेत संघातील अंतिम सामना?
भारत विरुद्ध कुवेत संघातील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.
भारत विरुद्ध कुवेत संघातील अंतिम सामना लाईव्ह कसा पाहाता येईल?
भारत विरुद्ध कुवेत संघातील अंतिम सामना लाईव्ह टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहाताय येईल, तसेच फॅनकोड ऍपवरही या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

उपांत्य फेरीत भारत-कुवेतचे रोमांचक विजय

उपांत्य फेरीत भारतीय संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये लेबनॉनला ४-२ अशा गोलफरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. तसेच कुवेतने बांगलादेशविरुद्ध उपांत्य सामन्यात ज्यादाच्या वेळेत गोल करत विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.

छेत्रीच्या अनुपस्थितीत भारत अंतिम सामन्यात अपराजित

सुनील छेत्रीने 2005 साली आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून भारतात झालेल्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झालेला नाही. त्यामुळे हीच लय मंगळवारीही कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

तसेच ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे की अंतिम सामन्यात स्टिमॅक यांच्या अनुपस्थितीत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका निभावणारे महेश गवळी हे 2005 मध्ये सॅफ चॅम्पियनशीप जिंकलेल्या भारतीय संघाचे भाग होते. आता त्यांना प्रशिक्षक म्हणून ही स्पर्धा जिंकण्याची संधी असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT