Rohit & Virat  Dainik gomantak
क्रीडा

IND vs AUS: 14 वर्षांनंतर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत निघणार, रोहित आणि विराटमध्ये शर्यत!

IND vs AUS: टीम इंडिया 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Manish Jadhav

IND vs AUS: टीम इंडिया 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळत नाही आणि अशा स्थितीत हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

त्याचबरोबर, या मालिकेत भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रमही मोडला जाऊ शकतो. हा विक्रम विराट कोहली किंवा रोहित शर्मा मोडू शकतो.

सचिनचा विक्रम मोडीत निघेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली सचिन तेंडुलकरची बरोबरी करु शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 70 डावात 9 शतके आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे.

विराटच्या नावावर 41 डावात 8 शतके आहेत. उद्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून विराट या विक्रमाची बरोबरी करु शकतो. दुसरीकडे, या मालिकेत त्याने दोन शतके झळकावली तर तो सचिनच्या पुढे जाईल.

रोहितही मागे नाही

त्याचवेळी, विराट कोहलीसह (Virat Kohli) रोहित शर्मा देखील संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 40 डावात 8 शतके झळकावली आहेत. पहिल्या वनडेत जिथे विराटला सचिनशी बरोबरी साधण्याची संधी असेल, तिथे रोहित दुसऱ्या वनडेतही हा पराक्रम करु शकतो.

IND-AUS सामन्यांमध्ये सर्वाधिक एकदिवसीय शतके

9 - सचिन तेंडुलकर (70 डाव)

8 - विराट कोहली (41 डाव)

8 - रोहित शर्मा (40 डाव)

6 - रिकी पाँटिंग (59 डाव)

5 - स्टीव्हन स्मिथ (18 डाव)

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, यजुवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर सूर्यकुमार यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

SCROLL FOR NEXT