Virat Kohli - Sachin Tendulkar
Virat Kohli - Sachin Tendulkar ICC
क्रीडा

Virat Kohli: 'तेव्हा पाय धरले, मनाचा ठाव घेतला अन् आता विराट...' 50 व्या शतकानंतर सचिनकडून तोंडभरून कौतुक

Pranali Kodre

Sachin Tendulkar React on Virat Kohli 50th ODI Century Record:

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक ठोकले आहे.

विराटने या सामन्यात 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

विराटच्या वनडे कारकिर्दीतील हे 50 वे वनडे शतक आहे. त्यामुळे त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विराट वनडेमध्ये 50 शतके करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.

विराटने हे शतक केले, तेव्हा वानखेडे स्टेडियमवर सचिन देखील उपस्थित होता, त्यावेळी विराटने सचिनसमोर झुकला. तो सचिनसमोर नतमस्तक झालेला व्हिडिओही व्हायरल होत आहे. दरम्यान, सचिनने विराटच्या या विक्रमाबद्दल त्याचे कौतुकही केले आहे.

सचिनने सोशल मीडियावर पोस्ट करताना विराटच्या भारतीय संघातील आगमनाची एक खास आठवणही सांगितली आहे.

सचिनने लिहिले की 'मी तुला पहिल्यांदा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये भेटलो, तेव्हा तुझी बाकी संघसहकाऱ्यांनी माझ्या पाया पडायला सांगून मस्करी केली होती. मी तेव्हा माझे हसू थांबवू शकलो नव्हतो. पण थोड्याच दिवसात तू तुझ्या जिद्दीने आणि कौशल्याने माझ्या मनाचाही ठाव घेतलास. मी आनंदी आहे की तो युवा मुलगा आता एक 'विराट' खेळाडू ठरला आहे.'

'एका भारतीयानेच माझा विक्रम तोडला, त्यासाठी मी यापेक्षा जास्त आनंदी असूच शकत नाही आणि तेही या मोठ्या स्तरावर, वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात. तसेच माझ्या घरच्या मैदानावर हे शतक आल्याने आणखीनच बहर आला आहे.'

दरम्यान, विराटचे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतके झाले आहेत. तो सचिननंतर 80 आंतरराष्ट्रीय शतके करणारा दुसराच क्रिकेटपटू आहे.

वनडेत सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू -

  • 50 शतके - विराट कोहली (291 सामने)

  • 49 शतके - सचिन तेंडुलकर (463 सामने)

  • 31 शतके - रोहित शर्मा (261 सामने)

  • 30 शतके - रिकी पाँटिंग (375 सामने)

  • 28 शतके - सनथ जयसूर्या (445 सामने)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: कोर्टाचा सख्त आदेश; घरमालकांनीच मोडली बेकायदेशीर घरे

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

Margao: कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम

Pakistan Car Blast: पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ मोठा कार स्फोट; माजी खासदारासह 4 जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT