Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar: ENG विरुद्धच्या दारुण पराभवानंतर क्रिकेटचा देव म्हणाला...

Team India: भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

दैनिक गोमन्तक

Sachin Tendulkar On Indian Team: भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर टीम इंडियावर सर्वत्र टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता, इंग्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रीया आली आहे. त्याने टीम इंडियासाठी मोठी गोष्ट सांगितली आहे.

सचिन तेंडुलकरने हे वक्तव्य केले

भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला की, 'इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीतील पराभव खूपच निराशाजनक आहे. अ‍ॅडलेड ओव्हलमध्ये 168 धावांचे लक्ष्य पुरेसे नव्हते, कारण मैदानाचा आकार असा आहे. सीमा लहान आहेत. आम्ही विकेट घेऊ शकलो नाही. इंग्लंड हा तगडा संघ आहे. 10 विकेट्सनी पराभूत होणे हा खूपच निराशाजनक पराभव आहे.'

खेळाडूंनाही चांगली कामगिरी करायची आहे

सचिन पुढे म्हणाला की, 'फक्त एका सामन्याच्या आधारे तुम्ही कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. टीम इंडिया टी-20 क्रिकेटमधला नंबर वन संघ आहे. हे एका रात्रीत घडत नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी दीर्घकाळ चांगले क्रिकेट खेळावे लागते. खेळाडूंनाही बाहेर जाऊन अपयशी व्हायचे नव्हते. खेळात चढ-उतार येतच राहतात. यात आपण एकत्र असायला हवे.'

टीम इंडियाचा लाजिरवाणा निरोप

2022 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात होते. पाकिस्तानचा (Pakistan) 4 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने चांगली सुरुवात केली, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्सने पराभव झाल्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरुन घसरली. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाला (Team India) विजयासाठी झगडावे लागले. तर उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

इंग्लंडविरुद्ध पराभूत

उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 168 धावा केल्या. तर इंग्लंडने एकही विकेट न गमावता सहज लक्ष्याचा पाठलाग केला. भारतीय गोलंदाज चांगले प्रदर्शन करु शकले नाही. त्याचवेळी रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत यांनाही चांगली फलंदाजी करता आली नाही. याच कारणामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT